राज्यातील 11 पोलिसांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर

128

विविध गुन्ह्यांच्या तपासात उल्लेखनीय अशी कामगिरी करणा-या पोलिसांचा केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सन्मान करण्यात येतो. यामध्ये महाराष्ट्रातील 11 पोलिसांना केंद्रीय गृहमंत्री पदक देण्यात येते. शनिवारी या पदकांचे मानकरी असणा-या पोलिसांची नावे केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आली आहेत.

केंद्रीय गृहमंत्री पदक उत्कृष्ट तपास 2022 च्या मानक-यांची घोषणा शनिवारी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून करण्यात आली आहे. यामध्ये देशभरातील एकूण 151 पोलिसांना हे पदक मिळणार असून यामध्ये राज्यातील 11 पोलिसांचा देखील समावेश आहे.

(हेही वाचाः ‘…तर बावनकुळेंचा मुख्यमंत्रीपदासाठी विचार होऊ शकतो’, फडणवीसांसमोर गडकरींचे मोठे विधान)

हे आहेत मानकरी

  1. कृष्णकांत उपाध्याय, उपपोलीस आयुक्त
  2. प्रमोद भास्करराव तोरडमल, निरीक्षक
  3. मनोज मोहन पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक
  4. दिलीप शिशुपाल पवार, निरीक्षक
  5. अशोक तानाजी विरकर, उप विभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ)
  6. अजित भागवत पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ)
  7. राणी तुकाराम काळे, सहाय्यक निरीक्षक
  8. दिपशिखा दिपक वारे, निरीक्षक
  9. सुरेशकुमार नानासाहेब राऊत, निरीक्षक
  10. जितेंद्र बोडप्पा वनकोटी, निरीक्षक
  11. समीर सुरेश अहिरराव, निरीक्षक

कधीपासून दिला जातो पुरस्कार?

2018 पासून केंद्रीय गृह मंत्रालयाकडून हा पुरस्कार देण्यात येतो. गुन्ह्यांच्या तपासात उत्कृष्ट अशी कामगिरी करणा-या पोलिस अधिका-यांना आणखी प्रोत्साहन देऊन त्यांचा सन्मान करण्यासाठी हे पदक देण्यात येते. राज्यातील 11 पोलिसांसह सीबीआयमधील 15, मध्य प्रदेशातील 10, उत्तर प्रदेश 10, केरळ, पश्चिम बंगाल आणि राजस्थान प्रत्येकी 8 यांसह इतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील पोलिस अधिकारी मिळून 151 जणांना हे पदक जाहीर करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.