विरारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली असून विरारमध्ये एकाच कुटुंबातील पाच लहान मुलांना अन्नातून विषबाधा झाली आहे. या घटनेमध्ये पाच पैकी दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे तर तिघांवर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. ही घटना शनिवारी घडली असून पोलिसांनी या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
(हेही वाचा – शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन, मराठा आरक्षण आंदोलनाचा आवाज हरपला)
काय आहे प्रकरण
मिळालेल्या माहितीनुसार, विरार पूर्व टोकरे ग्रामपंचायत टोकरे पाडा येथे घडली आहे. विरार पूर्व येथील टोकरे ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या भोयपाडा येथे अश्फाक खान आणि रजियाबानू खान हे आपल्या पाच मुलांसह राहतात. शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास या सर्वांनी एकत्र जेवण केले आणि ते झोपले. मात्र शनिवारी पहाटेच्या सुमारास अचानक मुलांची तब्येत बिघडली. सकाळी खान यांच्या ९ वर्षाचा मुलगा आसिफ खान आणि ८ वर्षाची मुलगी फरीफ खान यांना उलटी झाल्यामुळे त्यांना विरारच्या भाताणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते.
यानंतर १० वर्षांची मुलगी फराना खान, ४ वर्षाचा मुलगा आरीफ खान आणि ३ वर्षाचा मुलगा साहिल खान यांना पोटदुखी आणि उलटी होऊ लागल्याने त्यांना तुळींजच्या पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. माञ यातील आसिफ आणि फरीफ या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.