Eiffel टॉवरपेक्षाही जगातील सर्वात उंच रेल्वे पूलाच्या ‘गोल्डन जॉईंट’चं उद्घाटन, काय आहेत वैशिष्ट्य?

143

जम्मू काश्मीरमध्ये जगातील सर्वात उंच रेल्वे पूल चिनाब पूलाचे काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे. चिनाब पुलाच्या गोल्डन जॉईंटचं 13 ऑगस्ट रोजी उद्धघाटन करण्यात आले आहे. लवकरच या पुलाचे काम देखील पूर्ण होणार आहे. जम्मू काश्मीर मध्ये असणारा चिनाब ब्रीज जगातील सर्वांत उंच सिंगल आर्च रेल्वे ब्रीज ठरणार आहे. यामुळे भारताच्या इतिहासात एक सुवर्ण पान लिहिलं जाणार असल्याचे म्हटले आहे. ही भारताकरता अभिमानास्पद बाब आहे. या पुलामुळे भारताचा इतर भाग श्रीनगरशी जोडला जाणार आहे.

(हेही वाचा – Azadi ka Amrit Mahotsav: स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाला वेगळ्या पद्धतीने फडकावला जातो ध्वज! काय आहे फरक?)

जम्मू काश्मीरमध्ये असणारा चिनाब ब्रीज हा ब्रीज जम्मू उधमपूर बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा भाग असणार आहे. जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील कौरी गावाजवळ सलाल धरणाच्या वरच्या बाजूला या ब्रीजचे काम सुरू आहे. चिनाब नदीपात्रातून 359 मीटर उंची वरील ब्रीजचे ओव्हर आर्च डेक लॉंचिंग गोल्डन जॉईंटसह पूर्ण होणार असून गेल्या वर्षी जगातील सर्वात उंच अशा या रेल्वे ब्रीजच्या स्टील आर्चचे काम पूर्ण झाले.

काय आहेत वैशिष्ट्य?

  • जम्मू काश्मीरमध्ये असणारा चिनाब ब्रीज हा पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच असून चिनाब पुलाला जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचा दर्जा मिळाला आहे.
  • पुलाच्या संरचनात्मक तपशीलांसाठी ‘टेकला’ सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला आहे.
  • या पुलाचे स्ट्रक्चरल स्टील -10 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान सहन करू शकते.
  • 1 हजार 315 मीटर लांबीच्या चिनाब रेल्वे ब्रीजच्या बांधकामात साधारण 30 हजार 350 मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे.
  • तर आर्चच्या बांधकामात 10 हजार 620 MT स्टीलचा वापर झाला आहे. 14 हजार 504 MT स्टीलचा वापर ब्रीजच्या डेकच्या बांधकामात झाला असल्याचे सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.