देशातील काही राज्यांनी धर्मांतर विरोधी कायदा मंजूर केला आहे, त्यामध्ये आता हिमाचल प्रदेशाचाही समावेश करण्यात आला आहे. हिमाचल प्रदेश विधानसभेतही सामूहिक धर्मांतर करण्याच्या विरोधात एक कायदा पारित करण्यात आला आहे. या नव्या कायद्यातंर्गत जबरदस्तीने धर्म परिवर्तन केल्यास संबंधिताला 10 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.
धर्मांतराची व्याख्या तयार
हिमाचल प्रदेश सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. या वर्षाच्या शेवटी हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणूक होणार आहे. विधानसभेत द हिमाचल प्रदेश फ्रिडम ऑफ रिलिजन बिल, 2022 सर्वांच्या सहमतीने पारित करण्यात आलं आहे. या कायद्यामध्ये सामूहिक धर्म परिवर्तनाची व्याखा देण्यात आली आहे. त्यानुसार, जर एखादी व्यक्ती दोन किंवा त्याहून अधिक जणांचे धर्म परिवर्तन घडवून आणत असेल तर तो सामूहिक धर्मपरिवर्तन या श्रेणीत येईल आणि त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. देशात विशेषतः पूर्वांचल येथे ख्रिस्ती मिशनऱ्यांनी खोटी आमिषे दाखवून हिंदूंचे धर्मांतर करण्याचा सपाटा लावला, त्यामुळे या ठिकाणी काही राज्ये ख्रिस्ती बहुल बनली आहेत. त्यामुळे हा कायदा या परिस्थितीत महत्वाचा ठरत आहे.
(हेही वाचा Eiffel टॉवरपेक्षाही जगातील सर्वात उंच रेल्वे पूलाच्या ‘गोल्डन जॉईंट’चं उद्घाटन, काय आहेत वैशिष्ट्य?)
Join Our WhatsApp Community