काेराेनामुळे मागील दाेन वर्षांपासून बंद असलेली साेलापूर-पुणे-साेलापूर डेमू पॅसेंजर (गाडी क्र. ११४१७/१८) सुरू करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधांसाठी पुणे-सोलापूर-पुणे डेमू १५ सप्टेंबरपासून पूर्ववत करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये डेमूचा दर्जा बदलून एक्स्प्रेसचा दर्जा देण्यात आला आहे. यामुळे तिच्या तिकीट दरातही वाढ झाली आहे. तसेच गाडीचे थांबे कमी करण्यात आले असले तरी प्रवासाच्या वेळेत मात्र कोणतीही बचत झालेली नाही. यामुळे प्रवाशांचा एकप्रकारे तोटाच झाला आहे.
(हेही वाचा – ‘हर घर तिरंगा’ अभियानावरून Twitter वॉर! उद्धव ठाकरेंच्या प्रश्नाला भाजपाकडून चोख प्रत्युत्तर)
सप्टेंबरपासून ही गाडी सुरू हाेणार असल्याचे सांगितले जात आहे. तर पुणे-सोलापूर-पुणे डेमू पुणे येथून रात्री ११ वाजता सुटणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ७.५५ वाजता सोलापूरला पाेहाेचेल. तर सोलापूर -पुणे (डेमू) सोलापूरहून सकाळी ११.४० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी ७ .१९ वाजता पुण्याला पोहचणार आहे.
या ठिकाणा असणार थांबे
या गाडीला १२ डबे आहेत. भिगवण, वाशिंबे, फोफळज, जेऊर, केम, ढवळस, कुर्डुवाडी, वडसिंगे, माढा, वाकाव, अनगर, मलिकपेठ, मोहाेळ, मुंढेवाडी आणि पाकणी येथे थांबे असतील. सोलापूरच्या प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने घेतले आहे.
Join Our WhatsApp Community