बॉलीवूडमधील ‘उडता पंजाब’; सिनेतारका चौकशीपासून दूर पळू लागल्या 

194

मुंबई – अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणापासून सुरू झालेला तपास बेकायदेशीर अमली पदार्थ सेवन करणाऱ्या बॉलीवूड सिनेतारकांपर्यंत पोहचला आहे.  एनसीबीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. यात बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींचे नाव उघडकीस आले आहे. ज्यात दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. या सिने तारका आता या चौकशीपासून दूर पळू लागल्या आहेत.

‘डी’ चे गूढ उलघडणार 

अभिनेता सुशांतसिंग राजपूतची हुशार मॅनेजर जया शाह हिच्या चौकशीत तिने काही महत्त्वाची माहिती दिली आहे. यापूर्वी दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश हिलाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, परंतु तब्येत बिघडल्यामुळे तिने अधिक वेळ मागितला. शुक्रवारी करिश्माला हजर राहण्यास सूट देण्यात आली. एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले की, करिश्माच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटवर ‘डी’ अक्षरावरून ड्रग्जविषयी संभाषण उघडकीस आले. त्यामुळे एनसीबीला ‘डी’ नावाची व्यक्ती कोण आहे हे जाणून घ्यायचे आहे.

मधू मन्तेनाची चौकशी  

बुधवारी एनसीबीने चित्रपट निर्माता मधु मन्तेना यांची बराच काळ विचारपूस केली. मॅन्टेना २०१६ च्या ‘उडता पंजाब’ या व्यसनाधीनतेवर आधारित चित्रपटाचे सह निर्माते होते. दोन दिवसांपूर्वी जया शहा यांच्या चौकशीदरम्यान मन्तेना यांचेही नाव समोर आले होते. या प्रकरणाची सुशांत सिंगच्या मृत्यूशी जोडले जात आहे. आता हे प्रकरण पूर्णपणे ड्रग्स रॅकेटच्या तपासावर आधारित बनले आहे. एनसीबीने या प्रकरणात आतापर्यंत १९ जणांना अटक केली आहे, प्रदीर्घ चौकशीनंतरही ही मालिका वाढतच चालली आहे.

ड्रग रॅकेटचा पर्दाफाश 

अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या संशयास्पद मृत्यूच्या चौकशीत अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती आणि तिची मॅनेजर जया शहा यांच्या व्हॉट्सअॅप चॅट हाती लागले. या चॅटमधून बॉलिवूडची एक एक हस्ती या प्रकरणाशी जोडत गेली. रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतचा माजी कर्मचारी दीपेश सावंत आणि सॅम्युअल मिरांडा यांच्यासह आतापर्यंत १९ लोकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये बॉलिवूडमधील मादक पदार्थांच्या किरकोळ तस्करीचा समावेश आहे. या चौकशीत बॉलिवूडची बरीच प्रसिद्ध नावे समोर आली आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.