आज भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजवंदन केले. त्यांनी जनतेला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणा-या हुतात्म्यांचे त्यांनी स्मरण केले. तसेच, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारतातील तरुणांना नवा नारीदेखील दिला आहे.
जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधानची घोषणा केली आहे. लाल बहादूर शास्त्रींनी जय जवान, जय किसानचा नारा दिला. यानंतर अटल बिहार वाजयपेयींनी त्यात जय विज्ञान जोडले आणि आता त्यात जय अनुसंधान जोडण्याची वेळ आली आहे. आता जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान, असा नारा पंतप्रधानांनी दिला आहे.
( हेही वाचा: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह ‘या’ क्रांतीकारकांचे स्मरण करण्याची ही वेळ; पंतप्रधानांनी जागवल्या स्वांतत्र्यलढ्यातील आठवणी )
पुढची 25 वर्षे महत्त्वाची
भारतीय स्वातंत्र्याला यंदा 75 वर्षे पूर्ण झाली असून, अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशवासियांना संबोधित करताना, पंतप्रधान म्हणाले की, आपण स्वत:चीच प्रशंसा करत बसलो तर आपली स्वप्ने दूर निघून जातील. त्यामुळे 75 वर्षांचा कालखंड कितीही कठीण, चांगला असला तरी पुढील 25 वर्षे देशासाठी खूप महत्त्वाची आहेत. त्यामुळे 130 कोटी देशवासीयांच्या स्वप्नांकडे मी पाहत आहे. आगामी 25 वर्षांसाठी पंचप्राणावर आपली शक्ती केंद्रित करावी लागेल. जेव्हा स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होतील, तोपर्यंत आपल्याला सर्व स्वप्ने पूर्ण करण्यासाठी काम करावे लागेल. ज्यावेळी स्वप्ने आणि संकल्प मोठे असतात त्यावेळी शक्तीदेखील तितकीच मोठी असते. स्वातंत्र्याचा संकल्प मोठा होता. हा संकल्प मोठा असला तरी तो पूर्ण केला गेला. येत्या 25 वर्षात आपल्याला भारताला विकसित करायचे आहे. देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे होतील तेव्हा आजचे तरुण 50 ते 55 वर्षांचे होतील. तुमचे हे वय देशाला विकसित करण्याचे वय आहे. तरुणांनी तिरंग्याची शपथ घेऊन पुढे जावे. देशाच्या विकासासाठी काम करावे. भारत जेव्हा मोठे स्वप्न पाहतो, ते करुनदेखील दाखवतो.
Join Our WhatsApp Community