स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवानिमित्त काही सरकारी व खासगी कंपन्यांनी सोने, चांदीची विशेष नाणी जारी केली आहेत. केंद्र सराकारच्या एमएमटीसी कंपनीने 10 ग्रॅम सोन्याचे तसेच 31 ग्रॅम व 50 ग्रॅम शुद्ध चांदीची विशेष नाणी जारी केली आहेत. त्यांच्या विक्रीला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला. प्रख्यात नाणेतज्ज्ञ सुधीर लुणावत यांनी सांगितले की, नाण्यांच्या इतिहासात या नाण्यांना खास महत्त्व असणार आहे.
शुद्ध घडणावळ आणि प्रत्येकी वजन 7.5 ग्रॅम
खासगी क्षेत्रातील ऑगमेंट या कंपनीने स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त 7.5 ग्रॅमचे सोन्याचे व 7.5 ग्रॅमचे शुद्ध चांदीचे नाणे विक्रिसाठी उपलब्ध केले आहे. ऑगमेंट कंपनीने सोन्याच्या नाण्याची निर्मिती केंद्र सरकारच्या मुंबई टाकसाळीत केली आहे. हैदराबादमधील ओमकार मिट या खासगी कंपनीने स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त 20 ग्रॅम शुद्ध चांदीचे नाणे बनवले आहे.
( हेही वाचा: पुण्याच्या ऐतिहासिक शनिवारवाड्यासमोर ध्वजारोहण; पुणेकरांची उपस्थिती )
Join Our WhatsApp Community