बेस्ट उपक्रमाच्या महापालिकाकरणाचा आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून बेस्टने जाहीर केलेल्या बेस्ट आझादी योजनेअंतर्गत एक रूपयात सात दिवस पाच फेऱ्यांच्या प्रवासाचा लाभ प्रवाशांना घेता आला.
( हेही वाचा : #IndiaAt75 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; देशभरात जल्लोष, पहा क्षणचित्रे )
बेस्ट आझादी योजना १५ ऑगस्टपर्यंत लागू होती. या योजनेअंतर्गत प्रवाशांना वातानुकूलित किंवा विना वातानुकूलित बसमधून सात दिवस कितीही अंतराच्या पाच फेऱ्यांचा लाभ घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. आतापर्यंत बेस्ट आजादी योजनेचा एक लाखांपेक्षा अधिक मुंबईकरांना लाभ घेतल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली आहे.
काही महिन्यांपूर्वी बेस्टने ऑनलाईन मोबाईल तिकीट अॅप आणि बेस्ट चलो एनसीएमसी कार्ड सुविधा सुरू केली होती. या प्रणालीला चालना देण्यासाठी बेस्टने २ ऑगस्टपासून बेस्ट आझादी योजना सुरू केली होती. दरम्यान,बेस्टच्या ताफ्यात डिसेंबरपर्यंत ५०० हून अधिक वातानुकूलित बस दाखल होणार आहेत. त्यामुळे पुढील वर्षी मुंबईकरांना बेस्टच्या जवळपास सर्वच गाड्यांमधून गारेगार प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. या एसी बसेस मिडी, मिनीऐवजी १२ मीटर लांबीच्या असतील. तर काही दुमजली वातानुकूलित गाड्या सुद्धा उपक्रमाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.
बेस्टच्या इतर सुपर सेव्हर योजना!
प्रवाशांनी दैनंदिन तिकीट किती रुपये असते त्या पर्यायाची निवड करावी, त्यानुसार सुपर सेव्हर प्लॅन उपलब्ध होतील
उदाहरणार्थ,
- ५ रुपये तिकिट- ५० सहली (महिना) १९९ रुपये
- १० रुपये तिकिट- ५० सहली (महिना) ३९९ रुपये
- ५ रुपये तिकिट- १०० सहली(महिना) ७४९ रुपये
– स्पेशल पास
- रिपोर्टर/ पत्रकार – ३९५ रुपये
- दिव्यांग व्यक्ती – ३ वर्षे मोफत प्रवास
- शासकिय सेवानिवृत्त व्यक्ती- ९०० रुपये