Mobile Recharge : दरमहिन्याला रिचार्ज करण्याची गरज नाही; हे प्लॅन्स वर्षभर देतील दुप्पट Benefits

138

महागाईने उच्चांक गाठला असतानाच अलिकडे मोबाईल रिचार्ज सुद्धा महागले आहेत. आपल्यापैकी अनेक जण दरमहिन्याला किंवा ३ महिन्यांचा रिचार्ज करतात. परंतु युजर्सने एकदाच वर्षभराच्या वैधतेसह रिचार्ज केल्यास निश्चित फायदा होईल. अलिकडे ग्राहक सुद्धा या वर्षभराची वैधता असलेल्या प्लॅन्सला पसंती देत आहेत. वोडाफोन आयडिया (Vodafone Idea), एअरटेल (Airtel), जिओ (Jio) या कंपन्यांचे वर्षभराचे असंख्य प्लॅन्स आहेत. या प्लॅन्सविषयी जाणून घेऊया…

( हेही वाचा : AC Local : प्रवाशांचा प्रवास होणार गारेगार! एसी लोकलच्या आणखी १० फेऱ्या वाढणार)

वोडाफोन आयडिया (Vodafone Idea) – ३ हजार ९९ रुपये

वोडाफोन आयडियाचा (Vodafone Idea)प्लॅन हा ३ हजार ९९ रुपयांचा असून या प्लॅनची वैधता १ वर्ष म्हणजेच संपूर्ण ३६५ दिवस आहे. यामध्ये तुम्हाला दररोज २ जीबी डेटा याप्रमाणे एकूण ७३० जीबी डेटा मिळेल. अनलिमिटेड कॉल, दररोज १०० मोफत SMS तसेच १ वर्षासाठी Disney+Hotstar mobile चे मोफत सबस्क्रिप्शन देखील युजरला दिले जाते.

एअरटेल (Airtel) – २ हजार ९९९ रुपये

एअरटेलचा (Airtel)वर्षभराचा प्लॅन हा २ हजार ९९९ रुपयांचा असून याची वैधता संपूर्ण ३६५ दिवस असेल. यामध्ये दररोज २ जीबी डेटा, याशिवाय अनलिमिटेड कॉल, दररोज १०० मोफत एसएमएस, फ्री हॅलो ट्यून, FasTag वर १०० रुपये कॅशबॅक आणि Wynk म्युझिक फ्रीमध्ये युजर्सना वापरता येईल.

जिओ (Jio) – २ हजार ९९९ रुपये

जिओचा (Jio) ३६५ दिवसांचा प्लॅन २ हजार ९९९ रुपये आहे. यात दररोज २.५ जीबी डेटा याप्रमाणे एकत्रित ९१२.५ जीबी डेटा मिळेल. यात अनलिमिटेड कॉलस, दररोज १०० SMS तसेट Jio Apps आणि Disney+Hotstar mobile चे मोफत सबस्क्रिप्शन फ्री मध्ये दिले जाईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.