महापालिकेतील जनसंपर्क विभागात भरती…कोणत्या पदासाठी किती जागांसाठी रिक्त, जाणून घ्या..

170

मुंबई महापालिकेच्या जनसंपर्क खात्यातील सहायक जनसंपर्क अधिकारी पदाच्या जागा रिक्त असून  पाच रिक्त जागा आता भरल्या जाणार आहेत. महापालिकेच्या जनसंपर्क विभागाच्या माध्यमातून पाच जागा भरण्यासाठी जाहिरात प्रदर्शित करण्यात आली असून येत्या २ सप्टेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे.

पाच सहायक जनसंपर्क अधिकारी पदाच्या जागा भरल्या जाणार

मुंबई महापालिकेच्या जनसंपर्क विभागातील सहायक जनसंपर्क अधिकारी पदावरील अधिकाऱ्यांना बढती देण्यात आल्याने ही पदे रिक्त झाली आहेत. त्यामुळे या खात्यातील पाच सहायक जनसंपर्क अधिकारी पदासाठी जाहिरात प्रदर्शित करण्यात आली आहे. यामध्ये अनुसूचित जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल घटक आणि खुला घटक आदी पाच घटकांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे पाच सहायक जनसंपर्क अधिकारी पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत.  या सहायक जनसंपर्क अधिकारी पदासाठी ४१८००-१३२३०० अधिक अनुज्ञेय भत्ते अशाप्रकारे वेतनश्रेणी राहणार आहे.

(हेही वाचा रेड लाईट एरियातही ध्वजारोहण; ‘त्या’ घटकांनी दर्शवली उपस्थिती)

ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी :

१३ ऑगस्ट ते ०२ सप्टेंबर २०२२ या तारखेपर्यंत

या संकेतस्थळावर जावून पाहू शकता अधिक माहिती:

मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर पुढील लिंक https://portal.mcgm.gov.in/iri/portal/anonymous/girn  जावून पाहू शकतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.