देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात सोमवारी (१५ ऑगस्ट २०२२) मेरेथॉन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी ८ वाजल्यापासून रक्तदान शिबीर सुरुवात झाली, या रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिवस अखेर 617 युनिट रक्त संकलन झाले.
रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई अल्ट्रा आणि टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या सहकार्याने मेरेथॉन रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला ८०० जणांनी नोंदणी केली होती. लोकांनी मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवावा, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने करण्यात आले होते. हे रक्तदान रात्री ८ वाजेपर्यंत सुरू होते.
12 तास सुरू होते रक्त संकलन
सकाळी ८ ते रात्री ८ या दरम्यान तब्बल १२ तास हे रक्तदान शिबीर चालले होते. यामुळे रक्तदात्यांना देशाच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त केवळ १५ मिनिटे देऊन एक मोलाची मानव सेवा करता आली. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही स्मारकात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने स्वयंसेवक हे शिबिर यशस्वी करण्यासाठी झटले होते. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर आणि सह कार्यवाह स्वप्नील सावरकर यांनीही शिबिराला भेट देवून उपस्थितांचे मनोधैर्य वाढवले. शिबिरासाठी सावरकर स्मारकाने मोलाचे सहकार्य केले याबद्दल आयोजकांच्या वतीने आनंद काणे यांनी स्मारकाचे आभार व्यक्त केले.
Join Our WhatsApp Community