तेलंगणामधील खम्मम जिल्ह्यामधील एका गावात सोमवारी स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर, काही वेळातच चार अज्ञात लोकांनी दिवसाढवळ्या एका नेत्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते तम्मिनेनी कृष्णैया असे हत्या करण्यात आलेल्या नेत्याचे नाव आहे. या संपूर्ण घटनेनंतर परिसरामधील वाढता तणाव पाहून पोलिसांनी या भागामध्ये जमावबंदीचे कलम 144 लागू केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागाअंतर्गत येणा-या तेलडारुपल्ली गावामध्ये तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते तम्मिनेनी कृष्णैया यांच्यावर चार हल्लेखोरांनी हल्ला केला. याच हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. ध्वजारोहण कार्यक्रमाला हजेरी लावून पुन्हा आपल्या घरी जाण्याच्या मार्गावर असतानाच, कृष्णैया यांच्यावर हा हल्ला झाला. कृष्णैया हे 54 वर्षांचे होते.
( हेही वाचा: भाजप आमदाराच्या PA चे FB अकाऊंट हॅक; आमदाराविरोधात टाकली पोस्ट, तक्रार दाखल )
चार आरोपींचा शोध सुरु
खम्मम जिल्ह्याचे सहाय्यक पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, तम्मिनेनी कृष्णैया हे ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर आपल्या बाईकने पुन्हा घराकडे निघाले होते. ते तेलदरुपत्ती गावाच्या हद्दीतून जात होते. त्याचवेळी एका ऑटो रिक्षामधून आलेल्या चार जणांनी त्यांच्यावर धारधार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी आता या चार हल्लेखोरांना पकडण्यासाठी चार तुकड्या तयार केल्या आहेत.
Join Our WhatsApp Community