अनिल परबांच्या रिसॉर्टवर हातोडा पडणार? सोमय्यांनी ट्वीट करत म्हटले…

144

शिवसेनेचे नेते आणि माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टवर हातोडा पडणार असल्याचे ट्वीट भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मंगळवारी सकाळी केले. रिसॉर्टच्या बांधकामाप्रकरणी पर्यावरण मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर किरीट सोमय्यांनी तत्कालीन मंत्री आणि महत्त्वांच्या नेत्यांविरोधात आरोपांचा पाढा वाचला होता. यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे अनिल परब यांचाही समावेश होता. दापोली येथील साई रिसॉर्ट हे अनिल परब यांच्या मालकीचे असून परब यांनी पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून बांधकाम केले असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. तसेच हे रिसॉर्ट खरेदी करण्यासाठी गैरमार्गाने कमावलेला पैसा वापरला असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

(हेही वाचा – मुंबईतील Gazebo शॉपिंग सेंटरजवळ हवेत गोळीबार! एकाला अटक, तिघांचा शोध सुरू)

किरीट सोमय्यांनी आज, मंगळवारी सकाळी ट्वीट करून अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्ट प्रकरणात पर्यावरण मंत्रालयाकडे पाठपुरवठा सुरू असल्याची माहिती दिली. येत्या दोन ते चार दिवसात रिसॉर्ट पाडण्याचा अंतिम आदेश अपेक्षित असल्याचे सोमय्यांनी सांगितले. दरम्यान, पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी ३१ जानेवारी २०२२ रोजी दापोली रत्नागिरी येथील साई रिसॉर्ट हे अनिधकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. ९० दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र ९० दिवस पूर्ण झाले असून अद्याप हे रिसॉर्ट पाडण्यात आले नाही. या रिसॉर्टच्या व्यवहार प्रकरणात मनी लॉंड्रिंगचा आरोप करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.