सध्या विरोधक केंद्र सरकारच्या वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटीच्या नावाने शंख करत आहेत. त्यातच भाड्याने दिलेल्या घरासाठी देखील आता जीएसटी भरावा लागणार असल्याच्या बातम्या काही माध्यमांतून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता चिंतेत आहे.
पण याचबाबत आता केंद्र सरकारकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे. निवासासाठी भाड्याने दिलेल्या घरावर कोणत्याही प्रकारचा जीएसटी लागणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले असून, व्हायरल बातमी ही खोटी असल्याचे म्हटले आहे.
सरकारचा खुलासा
केंद्र सरकारच्या पीआयबी फॅक्ट चेक विंगने ट्वीट करत हा खुलासा केला आहे. जर भाडेकरूने निवासी मालमत्ता भाड्याने घेऊन त्या जागेचा वापर जीएसटी नोंदणीकृत कंपनीचा व्यवसाय करण्यासाठी केला तर त्या भाडेकरुला जीएसटी भरावा लागणार आहे. त्यामुळे निवासासाठी किंवा वैयक्तिक कारणासाठी भाड्याने घेतलेल्या घरावर जीएसटी आकारण्यात येणार नसल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Claim: 18% GST on house rent for tenants #PibFactCheck
▶️Renting of residential unit taxable only when it is rented to business entity
▶️No GST when it is rented to private person for personal use
▶️No GST even if proprietor or partner of firm rents residence for personal use pic.twitter.com/3ncVSjkKxP— PIB Fact Check (@PIBFactCheck) August 12, 2022
काय आहे अफवा?
जीएसटी कॉन्सिलच्या बैठकीत भाडेकरुंना भाड्यासोबतच 18 टक्के जीएसटी देखील भरावा लागेल, अशी अफवा काही बातम्यांमधून पसरवली जात आहे. याचबाबत आता केंद्र सरकारने स्पष्टीकरण देत नागरिकांमधील संभ्रम दूर केला आहे.
Join Our WhatsApp Community