राज्यातील काही जिल्ह्यांच्या नामांतरावरुन वाद सुरु असताना, बुलढाणा जिल्ह्याचे नाव लिहिण्यावरुनच गोंधळ उडाल्याची स्थिती दिसते. बुलडाणा की बुलढाणा, यापैकी नेमके काय लिहायचे यावरुन अनेक दिवसांपासूनचा वाद आहे. विविध सरकारी कार्यालयांमध्येही हा गोंधळ पहायला मिळतो. त्यामुळे सामान्य नागरिकदेखील द्विधा मन:स्थितीत असतात. मात्र देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्याधिका-यांमार्फतच या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर देण्यात आले आहे. तसेच, इथून पुढे जिल्ह्याचे किंवा शहराचे नाव लिहिताना बुलढाणा असेच लिहावे, अशा सूचनादेखील त्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे आता नागरिकांचाही गोंधळ उडणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
…म्हणून नावात झाला घोळ
इंग्रजांच्या काळात जिल्हा मुख्यालय झालेल्या भिलठानाचे कालांतराने नामकरण झाले. जिल्ह्याच्या गॅझेटमध्ये सुद्धा जिल्हा मुख्यालयाचा बुलढाणा असाच उल्लेख आहे. अनेकदा शासकीय व्यवहारमध्ये ढा च वापरला जातो. मात्र काही ठिकाणी कालांतराने नावात अपभ्रंश होत गेले आणि ढा ऐवजी डा झाले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात रंगरंगोटी, डागडुजी करण्यात आली. त्यावेळीसुद्धा बुलडाणा ऐवजी आता बुलढाणा लिहिण्यात आले. यातही विशेष म्हणजे मुख्य प्रवेशद्वारावरसुद्धा जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा.. असा बदल करण्यात आला.
( हेही वाचा: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर काश्मिरी पंडिताची दहशतवाद्यांकडून हत्या )
Join Our WhatsApp Community