‘पटापट आंघोळी करा’, BCCI चे टीम इंडियाला आवाहन! काय आहे कारण?

135

के.एल. राहुलच्या नेतृत्वात सध्या भारतीय संघ तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी झिम्बाब्वे दौ-यावर आहे. पण आता याच मालिकेबाबत बीसीसीआयकडून भारतीय संघाला काही सूचना करण्यात आल्या आहेत. झिम्बाब्वे मध्ये सध्या पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळे BCCI ने भारतीय संघाला पाणी वाचवण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी कमीत कमी पाण्याचा वापर करुन आन्हिकं उरकण्याच्या सूचना बीसीसीआयने दिल्या आहेत.

BCCI च्या सूचना

हरारे येथे भारताचा झिम्बाब्वे विरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळवण्यात येणार आहे. पण हरारे येथे सध्या मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईची समस्या आहे. त्यामुळे याची दखल भारतीय क्रिकेट नियामक मंडळ(BCCI)कडून घेण्यात आली आहे. त्यामुळे स्विमिंग पूलमध्ये आंघोळ न करता खेळाडूंनी कमीत कमी पाण्यात आंघोळ उरकावी, अशा सूचना बीसीसीआयने खेळाडूंना केल्या आहेत.

(हेही वाचाः EPFO: PF खातेधारकांना मिळणार 7 लाखांचा लाभ, त्यासाठी लवकर पूर्ण करा ‘हे’ काम)

काय आहे पाणीटंचाईचे कारण?

हरारे शहरात दरवर्षी पाणी संकट निर्माण होते. हरारेच्या पश्चिम भागात मागच्या तीन आठवड्यांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. पाण्यावर प्रक्रिया करणारी आवश्यक ती केमिकल्स उपलब्ध नसल्यामुळे हे पाणी संकट निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. मॉरटॉन जॅफफ्रे येथील वॉटर ट्रीटमेंट प्लान्टमध्ये पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठीचे केमिकल्स नाहीत. या प्लान्टच्या माध्यमातून तब्बल 20 लाख नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.