विघ्नसंतोषी लोकांच्या विरोधाला न जुमानता अमृतमहोत्सव जल्लोषात साजरा

126

१५ ऑगस्ट २०२२ हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरुन ठेवण्यासारखा आहे. १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला. परंतु स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला स्वतःचं रक्त सांडावं लागलं तसं स्वातंत्र्याच्या आदल्या दिवशी देखील आपलं रक्त सांडलं गेलं. दुर्दैवी अशी फाळणी झाली आणि हिंदूंच्या कत्तली झाल्या. आपल्या आई-बहिणींची अब्रू लुटली गेली. या धक्क्यातून आपल्याला सावरण्यास वेळ मिळाला नाही आणि लगेच दुसर्‍या दिवशी आपण स्वातंत्र्याचा जल्लोष केला. तत्कालीन राज्यकर्त्यांना फाळणी रोखता आली नाही आणि फाळणीमुळे झालेलं भयंकर नुकसान देखील टाळता आलं नाही.

( हेही वाचा : प्रसारमाध्यमांच्या ‘न्यूड’ बातम्या, लोकशाहीचा चौथा स्तंभ घसरलाय)

इतका पराकोटीचा त्याग करुन आपण हे स्वातंत्र्य मिळवलं आहे आणि अबाधित देखील ठेवलं आहे. आता या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव म्हणजे प्रचंड आनंदाचा क्षण. हा क्षण प्रत्येक भारतीयाने साजरा केला पाहिजे. हा राष्ट्रीय सण आहे, राष्ट्रीय उत्सव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हर घर तिरंगा या मोहिमेसाठी आवाहन केलं. लोकांनी हे आवाहन स्वीकारलं आणि घराघरावर तिरंगा फडकताना दिसला.

पण काही विघ्नसंतोषी लोकांनी यात विघ्न आणण्याचा प्रयत्न केला. मोदींनी आपला डीपी म्हणून तिरंगा ठेवा असं म्हटल्यावर कॉंग्रेसींनी नेहरुंनी झेंडा हाती घेतलेला फोटो ठेवला. मोदींनी माझा फोटो ठेवा असं सांगितलं नव्हतं. मग या गोष्टीत खुसपटं काढण्यासारखं काय होतं? पण मोदी जे करतील त्यास विरोध करायचा हा एकच कार्यक्रम सध्या कॉंग्रेस राबवत आहे. हर घर तिरंगा मोहिमेला विरोध करत ज्यांच्या घरावर तिरंगा नाही, त्यांना देशद्रोही ठरवणार का? ज्यांच्याकडे घर नाही त्यांनी तिरंगा कुठे लावायचा असले विक्षिप्त प्रश्न विचारले. पण जनतेने मात्र या लोकांना तोंडावर पादळं आहे.

अनेक लोकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवला आहे. अनेकांनी आपला डीपी बदलला. इतकंच नव्हे तर अगदी रीक्षांवर सुद्धा तिरंगा दिसला. समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्तीने आपला अमृत महोत्सव साजरा केला आहे. अनेक सोसायटींमध्ये झेंडा वंदन व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले आहेत. १५ ऑगस्ट २०२२ रोगी सगळीकडे तिरंगा दिसला. हे ७५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले आहे. लोकांनी या विघ्नसंतोषी लोकांच्या विरोधाला न जुमानता आपला अमृतमहोत्सव जल्लोषात साजरा केला आहे. ‘याल तर तुमच्यासह, नाही आलात तर तुमच्या शिवाय आणि विरोधात गेलात तर तुमचा विरोध मोडून आम्ही पुढे जाणारच’ हा संदेश भारतीय जनतेने या लोकांना दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.