MSRTC : लालपरीचा प्रवास होणार आरामदायी! पुन्हा ताफ्यात येणार AC Sleeper बस

151

सध्या अनेक खासगी कंपन्या प्रवाशांना बससेवा देत आहेत. खासगी प्रवासी कंपन्यांमुळे निर्माण झालेल्या स्पर्धेत तोंड देण्यासाठी एसटी महामंडळाने लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी वातानुकूलित शयनयान बससेवा (AC Sleeper Bus) उपलब्ध करण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू केली आहे. हैदराबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या देशभरातील बस ओनर्स असोसिएशनच्या प्रदर्शनाला एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच भेट दिली. यानंतर एसटीच्या ताफ्यात वातानुकूलित शयनयान बसचा समावेश करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

( हेही वाचा : स्वस्त मस्त BEST! आता ३१ ऑगस्टपर्यंत करता येणार १ रुपयांत बसप्रवास; योजनेला मुदतवाढ)

या प्रदर्शनात विविध बसची पाहणी केल्यानंतर पुन्हा एकदा एसटीच्या ताफ्यात एसी स्लिपर बसचा समावेश करण्याची चर्चा सुरू झाली आहे. जानेवारी २०१८ मध्ये परिवहन महामंडळाने वातानुकूलित शयनयान शिवशाही बसची सेवा सुरू केली. त्यानंतर २०१९ मध्ये या बसच्या तिकीट दरात कपात केली, आता पुन्हा एसी स्लिपर कोच बससेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत.

टाटा कंपनीकडून महामंडळ ७०० विनावातानुकूलित बस घेणार

महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ३६ शयनयान असलेली साडेतेरा मीटर लांबीच्या बसची पाहणी केली. यासह अन्य कंपन्यांच्या शयनयान बसगाड्यांचीही माहिती घेण्यात आली आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

एसटी महामंडळ टाटा कंपनीकडून ७०० विनावातानुकूलित बस घेणार आहे. यापैकी ५० बस विनावातानुकूलित शयनयान प्रकारातील असल्याचेही सांगण्यात आले आहे. २०२३ मध्ये जानेवारी किंवा फेब्रुवारीत या बस ताफ्यात येणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.