सांगलीत बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण; प्लाॅट दाखवण्याच्या बहाण्याने किडनॅपिंग

158

सांगलीतील बांधकाम व्यावसायिकाच्या अपहरणाचे वृत्त समोर आल्याने, संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही घटना मिरज तालुक्यातील तुंग इथे घडली आहे. शनिवारी 13 ऑगस्ट रोजी ही घटना घडली असून, आता हा प्रकार उघडकीस आला आहे. सांगलीतील बांधकाम व्यावसायिक माणिकराव पाटील यांचे अपहरण करण्यात आले. प्लाॅट दाखवण्याच्या बहाण्याने त्यांना कारमधूनच रातोरात अपहरणकर्त्यांनी पळून नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सांगील ग्रामीण पोलिसांत या अपहरणाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

( हेही वाचा दिलासादायक बातमी; CNG आणि PNG च्या दरात मोठी कपात )

तीन आठवड्यांपूर्वी बाळाचे अपहरण

सांगलीच्या तासगावात तीन आठवड्यांपूर्वी एका बाळाचेही अपहरण करण्यात आले होते. एका नवजात बाळाचे नर्सनेच अपहरण केले होते. 24 जुलै रोजी ही अपहरणाची घटना समोर आली होती. त्यानंतर सीसीटीव्हीत बाळाला पळवून नेणारी महिला कैद झाली. अपहरणाच्या तक्रारीनंतर अखेर आरोपी महिलेला पकड्यातही यश आले होते. दरम्यान, आता एक बांधकाम व्यावसायिकाच्या अपहरणामुळे सांगलीत चाललंय तरी काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.