आता मुसळधार पाऊस किंवा पुरामुळे रस्ते खराब होणार नाहीत. कारण ते आता खडी, वाळूऐवजी स्टीलच्या कच-यापासून बनवण्यात येणार आहेत. सीमा रस्ते संघटना अरुणाचल प्रदेशातील मुसळधार पावसाच्या क्षेत्रात असाच एक रस्ता बांधत आहे. असाच प्रयोग गुजरातमधील हजीरा येथे यापूर्वीच यशस्वी झाला आहे.
केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेने काही मुख्य स्टील उत्पादक कंपन्या आणि पोलाद मंत्रालयाच्या मदतीने हजीरा येथे 1.1 किलोमीटरचा रस्ता स्टील स्लॅगपासून बनवला आहे. लोह खनिजापासून स्टील बनवल्यानंतर,उरलेल्या टाकाऊ पदार्थाला स्लॅग म्हणतात. सीआरआरआयने रस्तेबांधणीत वाळू आणि खडीच्या जागी या कच-याचा वापर केला आहे. स्टील स्लॅगपासून बनवण्यात येणारा रस्ता सामान्य रस्त्याच्या तुलनेत अनेक पटीने अधिक मजबूत असल्याचे सिद्ध होत आहे.
( हेही वाचा :धक्कादायक: शिक्षकाकडून पाकिस्तान जिंदाबादची घोषणा, शाळेतून केली हकालपट्टी )
एशिया बुक ऑफ रेकाॅर्डमध्ये नोंद
आता या कच-याचा उपयोग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे बांधण्यात येणा-या रस्त्यांतही करण्यात येईल. तसेच, रेल्वे रुळाच्या कडेला टाकण्यात येणा-या खडीच्या ठिकाणीही याचा वापर करण्याची योजना आहे. या तंत्रज्ञानाचा एशिया बुक ऑफ रेकाॅर्ड आणि इंडिया बुक रेकाॅर्डमध्येही समावेश करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community