भाजपाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबईचे अध्यक्षपदी निवड झालेले आशिष शेलार यांनी त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली. यावेळी स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे आणि सहकार्यवाहक स्वप्नील सावरकर उपस्थित होते.
वीर सावरकरांचे व्यक्तीमत्त्व उत्तुंंग – आशिष शेलार
भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट देत, स्मारकातील कार्यपद्धतीचे कौतुक केले. यावेळी त्यांनी स्मारकात राबवण्यात येणा-या उपक्रमांविषयी माहिती घेतली. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी उर्दूमध्ये लिहिलेल्या कवितेची वही पाहिली. ‘1857 चे स्वातंत्र्यसमर’ या पुस्तकाची मूळ हस्तलिखित प्रतदेखील बावनकुळे आणि आशिष शेलार यांनी पाहिली. त्यानंतर वीर सावरकरांचे व्यक्तीमत्त्व उत्तुंंग असल्याचे उद्गार त्यांनी यावेळी काढले. इतक्या महान व्यक्तीमत्त्वावर आजही आरोप केले जातात, हे आपले दुर्दैव आहे, असेही आशिष शेलार म्हणाले.
( हेही वाचा: जांबोरी मैदान तो झांकी है, अभी बहुत कुछ बाकी है; शेलारांचा सूचक इशारा )
Join Our WhatsApp Community