महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सभागृह नेतेपदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी नियुक्ती करण्यात आली. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी त्यासंदर्भातील घोषणा केली.
(हेही वाचा – संजय शिरसाट, कालिदास कोळंबकर नवे तालिका अध्यक्ष)
यापूर्वी अजित पवार हे विधानपरिषदेचे सभागृह नेते होते. सत्ताबदल झाल्यानंतर हे पद रिक्त होते. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानपरिषदेच्या सभागृह नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची, तर तालिका सभापतीपदी प्रसाद लाड यांच्यासह चार जणांची निवड करण्यात आली.
तालिका अध्यक्षपदी कोण?
भाजपकडून प्रसाद लाड, शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राष्ट्रवादीचे अब्दुल खान दुर्राणी आणि कॉंग्रेसकडून सुधीर तांबे यांची तालिका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
माजी सदस्यांना श्रद्धांजली
विधानसभेत सहा माजी सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी शोकप्रस्ताव मांडला. माजी सदस्य भरत बहेकर, बाबुराव पाचर्णे, जनार्दन बोंद्रे, नानासाहेब माने, रावसाहेब हाडोळे, उद्धवराव शिंगाडे यांना विधानसभेत आदरांजली वाहण्यात आली.
Join Our WhatsApp Community