विविध पर्यटनस्थळांना भेट देऊन लोकांना माहिती नसणाऱ्या जागा सोशल मिडियावर एक्स्पोलर करण्याकडे अलिकडच्या तरूणाईचा कल आहे. यातील अनेक ठिकाणी पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील परिसर असल्याने पक्के बांधकाम करता येत नाही. परिणामी हॉटेल किंवा घरगुती निवासाच्या सोयी सुद्धा कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. अशा भागात प्रवास करण्यासाठी कॅराव्हॅन व कॅम्परव्हॅनच्या साहाय्याने पर्यटकांना निवासाच्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
( हेही वाचा : मुंबई-पुणे महामार्गावर वाढते अपघात; आता वाहनांवर राहणार ITMS सिस्टिमची नजर )
राज्यात आता पर्यटनस्थळी जाण्यासाठी आपण वैयक्तिक कॅराव्हॅन वापरू शकतो. अशा कॅराव्हॅनना पर्यटनस्थळी नेत त्यामध्ये निवास करण्यासाठी परवानगी पर्यटन विभागाकडून देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. त्यानुसार आतापर्यंत राज्यात ३ कॅराव्हॅनना परवानगी देण्यात आली आहे. परदेशाच्या धर्तीवर देशातील गुजरात, केरळ या राज्यांमध्ये कॅराव्हॅन धोरण राबविण्यात आले आहे. आता महाराष्ट्रात सुद्धा कॅराव्हॅन अथला कॅम्पर व्हॅनच्या माध्यामातून पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे. तसेच वेगळ्या अनुभवासाठी हॉटेल्स किंवा रिसॉर्टमध्ये राहण्यापेक्षा पर्यटक या कॅराव्हॅनमधून सफर करू शकतात.
कॅराव्हॅन बुकिंग कसे कराल?
- कॅराव्हॅन अथला कॅम्पर व्हॅनच्या बुकिंगसाठी तुम्ही www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
- अधिक माहितीसाठी 020-29900289 किंवा [email protected] यावर ई-मेल करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.