नाल्यावरील लोखंडी झाकणे चोरणाऱ्याला अटक, प्रत्येकी १२० किलो वजन असलेली ९ झाकणे जप्त

133

पूर्व उपनगरातील मुलुंड पश्चिमेला असणाऱ्या निर्मल लाईफ स्टाईल या ठिकाणी असलेल्या नाल्यावरील झाकणे चोरणाऱ्या एका टोळीतील एकाला मुलुंड पोलिसांनी अटक केली आहे. या चोराकडून पोलिसांनी ९ लोखंडी झाकणे जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या एका झाकणाचे वजन १२० किलो असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांतीलाल कोथमिरे यांनी दिली.

तब्बल १६ झाकणे चोरीला गेल्याची तक्रार

बासू गंगाधार वर्मा (२०) असे अटक करण्यात आलेल्या झाकण चोर टोळीतील एका सदस्याचे नाव आहे. बासू वर्मा हा मुलुंड पश्चिमेतील अमर नगर परिसरात राहत आहे. मुलुंड पश्चिम येथील एलबीएस मार्गावर असलेल्या निर्मल लाईफ स्टाईल मॉल जवळ असणाऱ्या नाल्यावरील लोखंडी जाळीचे झाकणे चोरीला जात असल्याची तक्रार मुलुंड पोलीस ठाण्यात दाखल झालेली होती. चोरट्यांनी एक नाही तर तब्बल १६ झाकणे चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. एका झाकणाचे वजन १२० किलो असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

(हेही वाचा मोदी सरकारचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना ३ लाखापर्यंतच्या कर्जामध्ये १.५ टक्के सूट)

९ झाकणे जप्त केली

या झाकण चोराचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांतीलाल कोथमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. गणेश मोहिते आणि त्यांचे पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीने झाकण चोरांचा शोध घेत अमर नगर येथून बासू गंगाधार वर्मा याला अटक करण्यात आली. त्याच्याजवळून पोलिसांनी ९ झाकणे जप्त केली करण्यात आली आहेत. नाल्यावरील झाकणे चोरी करणारी टोळी असून या टोळीत आणखी काही सदस्य असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ही टोळी भरपावसात रस्त्याच्या कडेला टेम्पो उभा करून नाल्यावरील झाकणे काढून ती चोरी करीत होती, भरपावसाळ्यात नाल्यावरील झाकणे चोरी करून ही टोळी नागरिकांच्या जीवाशी खेळत होती. या टोळीच्या इतर सदस्याचा शोध घेण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.