भारतरत्न लतादिदींच्या अंत्यविधीवर १ कोटींचा खर्च

136

गानकोकीळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांचे अंत्यसंस्कार दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क) करण्यात आले. या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमावर १ कोटी १ लाख रुपयांचा खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागाने हा एकूण खर्च केलेला असून, याचं विवरण पत्र हाती आले आहे.

( हेही वाचा : नाल्यावरील लोखंडी झाकणे चोरणाऱ्याला अटक, प्रत्येकी १२० किलो वजन असलेली ९ झाकणे जप्त)

भारतरत्न लता मंगेशकर यांचे ६ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पुढील अंत्यविधी शिवाजी पार्क येथील भागोजी किर स्मशानभूमीमध्ये केला जाणार होता, परंतु या अंत्यविधीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तसेच इतर अति महत्वाचे माननीय महोदय उपस्थित राहणार असल्याने अंत्यविधीचा हा कार्यक्रम दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क) करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे या अंत्यविधीची व्यवस्था करण्यासाठी अन्य मंडप, खुर्च्या, सोफा सेट, व्हीव्हीआयपी व्हॅनिटी व्हॅन, एलईडी लाईट्स, अंत्यदर्शनाचे थेट प्रक्षेपण तसेच मुखाग्नीकरता चंदनाचे लाकूड तसेच फुलांचे सुशोभिकरण आदींकरता हा १ कोटी ०१ लाख ७१ हजार ४०४ रुपयांचा खर्च झाला होता.

अशाप्रकारे झाला खर्च

  • विविध प्रकारचे मंडप, खुर्चा सोफा सेट, रेड कार्पेट, बॅरेकेट्स तसेच साऊंड सिस्टीम : २१ लाख ६१ हजार
  • व्हीव्हीआयपी व्हॅनिटी व्हॅन तसेच एलईडी लाईट्सची व्यवस्था : ४ लाख ४३ हजार ६५८
  • पार्थिवाचे अंतिम दर्शन व अंत्यविधीचे थेट प्रक्षेपण करण्याची व्यवस्था : ५ लाख ४२ हजार ६८२
  • पार्थिवाच्या मुखाग्नतीकरता चंदनाचे लाकूड : ६८ लाख ६३ हजार
  • फुलांचे सुशोभिकरण : १ लाख ६० हजार
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.