गणेशोत्सवासाठी चाकरमानी मुंबई-पुण्यातून कोकणात दाखल होतात. त्यामुळे गणपतीला कोकणात जाण्यासाठी अतिरिक्त गाड्यांचे नियोजन दरवर्षी करण्यात येते. गणेशोत्सवासाठी चिपळूण आगार सज्ज झाले आहे. मुंबई परिसरात राहणाऱ्या चाकरमान्यांना गावी आणण्यासाठी चिपळूण आगारातून १६० जादा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय दररोज ८० गाड्या नियमित धावणार आहेत.
( हेही वाचा : ईडीच्या तीन ठिकाणी धाडी, संजय राऊतांच्या अडचणीत वाढ)
चिपळूण आगारातून १६० जादा गाड्या
गणरायाचे आगमन ३१ ऑगस्टला घरोघरी होणार आहे. त्याकरिता मुंबई, बोरिवली, ठाणे, कल्याण, खार आदी ठिकाणांहून चाकरमान्यांना गावी सुरक्षित पोहोचता यावे, यासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. गणेशभक्तांना त्यांच्या निश्चित स्थळी पोहोचवण्यासाठी चिपळुण येथून बसची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेशोत्सवात गावी येणाऱ्या तसेच परतीच्या मार्गावरील भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी एसटीने व्यवस्था केली आहे.
बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई, बोरिवली, ठाणे, पुणे या ठिकाणी नोकरीनिमित्त असलेले चाकमानी खास सुट्टी काढून गावी येण्याच्या तयारीत आहेत. गणेशोत्सवात गावी येणाऱ्या तसेच परतीच्या मार्गावरील भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी एसटीने व्यवस्था केली आहे.
Join Our WhatsApp Community