एक धक्का और दो पाकिस्तान तोड दो, या घोषणा पुन्हा एकदा देण्याची वेळ आलेली आहे. आपल्या देशाने ७५ वर्षे पूर्ण केलेली आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अखंड भारताचे स्वप्न पाहिले होते. त्यांना सिंधू नदी मुक्त करायची होती. हे अखंड भारताचं स्वप्न जेव्हा पूर्ण होईल तेव्हा होईल. परंतु पीओके घेण्याची हीच योग्य वेळ आहे. गेल्या ७५ वर्षांच्या इतिहासात जगाला हे कळून चुकलेलं आहे की पाकिस्तानला एक देश म्हणून मान्यता देऊन खूप मोठी चूक झालेली आहे. पाकिस्तान हे आतंकवाद्यांचं केंद्र झालं. ही केवळ भारताची डोकेदुखी नसून जगाची डोकेदुखी झालेली आहे.
( हेही वाचा : ईडीच्या तीन ठिकाणी धाडी, संजय राऊतांच्या अडचणीत वाढ)
श्रावण महिन्यात अनेक सण असतात. त्यात गोपाळकाला हा एक महत्वाचा आणि सर्वांचाच आवडता सण आहे. मुंबईची दही हंडी खूप प्रसिद्ध देखील आहे. हिंदुंमध्ये प्रत्येक कृती करताना राष्ट्रीय जाणीव निर्माण झाली पाहिजे. म्हणजे तुम्ही जर नोकरी किंवा व्यवसाय करत असाल तर त्यातून मिळणारे पैसे तुम्ही स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वापरता. थोडं फार दान-धर्म करत असाल. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का की, तुम्ही जे काम करता त्यामुळे भारताची प्रगती होत आहे, भारताचा विकास होत आहे? असा विचार करत नसाल तर आजपासून असा विचार करायला लागा.
केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीलाच देशभक्ती दाखवली पाहिजे असा नियम नाही. तुम्ही देशभक्तीची भावना रोज बाळगू शकता. तुमची राजकीय मागणी काय आहे? हे जास्त महत्वाचं आहे. तुम्हाला पेट्रोल स्वस्त झालेलं हवं आहे की देशात हिंदूभावविश्व निर्माण झालेलं हवं आहे? पेट्रोल किंवा दैनंदिन उपयोगाच्या गोष्टी स्वस्त झाल्या पाहिजेत यात वाद नाही. पण हिंदू म्हणून तुमची राजकीय मागणी संकुचित असेल तर तुमच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो. त्याचसाठी हिम्दुंमध्ये राष्ट्रीय जाणीव निर्माण झाली पाहिजे.
आता गोपाळकाला या आवडत्या उत्सवातसुद्धा तुम्ही राष्ट्रीय जाणीव निर्माण करु शकता. हंडी फोडायच्या आधी थर लावतात, मग गोविंदा सर्वात वर चढतो आणि हंडी फोडतो. मग असा विचार करुन पाहा की ती हंडी म्हणजे पीओके आहे आणि हंडी फोडणारे भारतीय सैन्य. गोविंदा हा भारतीय सैन्यातील प्रमुख अधिकारी. अतोनात कष्ट घेत तो सर्वात वरच्या थराला पोहोचतो आणि मग हंडी फोडतो म्हणजेच पीओके मुक्त करतो.
या गोपाळकालाच्या मुहूर्तावर हिंदू म्हणून, भारतीय म्हणून आपण गृहमंत्र्यांना पत्र पाठवली पाहिजे की आम्हाला पीओके हवा आहे. अहो, नेत्यांनाही कळू द्या आपल्या मागण्या काय आहेत. आपण मागणी न करता जर ३७० रद्द होऊ शकतं, तर मागणी केल्यावर पीओके का नाही घेणार? आपण आपल्या राजकीय मागण्या, आपल्या राष्ट्रीय गरजा सुनिश्चित केल्या पाहिजे. हर घर तिरंगा या मोहिमेतून आपण एकजूट दाखवली आहे. आपल्याला आणखी मोठा पल्ला गाठायचा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वप्नातला भारत घडवायचा आहे.
Join Our WhatsApp Community