महानगरपालिकेच्या विविध कार्यालयांतील कर्मचारी सामूहिक राष्ट्रगीत गायनात सहभागी

114

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने, “स्वराज्य महोत्सव” अंतर्गत, मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासह सर्व विभाग कार्यालये, शाळा, रुग्णालये व इतर कार्यालयांमध्ये बुधवारी सकाळी ठिक ११ वाजता समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले.

राष्ट्रगीत गायन उपक्रम

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने, दिनांक ९ ते १७ ऑगस्ट २०२२ दरम्यान “स्वराज्य महोत्सव” आयोजित करुन विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य शासनाने दिले होते. त्यानुसार महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा, सहआयुक्त (सामान्य प्रशासन) मिलीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयांकडून भरगच्च कार्यक्रम, उपक्रम मागील आठवड्याभरात संपन्न झाले. शासनाच्या निर्देशानुसार, मंगळवारी महानगरपालिकेच्या सर्व आस्थापनांमध्ये सकाळी ठिक ११ वाजता समूह राष्ट्रगीत गायन उपक्रम देखील राबवण्यात आला.

( हेही वाचा : भारतरत्न लतादिदींच्या अंत्यविधीवर १ कोटींचा खर्च)

महानगरपालिका मुख्यालयात सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणेवरून राष्ट्रगीत प्रसारित करण्यात आले. त्यावेळी मुख्यालयातील सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यालयात उपस्थित राहून राष्ट्रगीत गायन केले. महानगरपालिकेची सर्व कार्यालये, विभाग कार्यालये, रुग्णालये, शाळा आणि इतर सर्व आस्थापनांमध्ये देखील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उत्साहाने समूह राष्ट्रगीत गायन उपक्रमात सहभाग घेतला.

New Project 5 11

मुंबई महापालिकेत आपत्कालीन प्रसंगी कर्मचाऱ्यांना सूचना करता याव्यात म्हणून स्पीकर बसवण्यात आले असून मंगळवारी सामुहिक राष्ट्रगीताची माहिती देण्याकरता उदघोषणा करण्यात आली. परंतु पहिल्या मजल्यावसह अनेक मजल्यांवर ही उदघोषणा ऐकायलाच मिळाली नाही. परंतु अकराची वेळ साधत अनेक विभागांतील कर्मचारी व अधिकारी या समूह राष्ट्रगीत गायनात सहभागी झाले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.