मुंबईत खड्ड्यांमुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. अंधेरीच्या दिशेने येत असलेल्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. जोगेश्वरी, गोरेगाव आणि मालाडमध्ये द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनानंतर देखील मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावर काही प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. बोरिवली नॅशनल पार्कसमोर खड्डे अधिक प्रमाणात आहेत. या खड्ड्यांमुळे बुधवारी दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. पण तरीदेखील प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही. खड्ड्यांमुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहतूक पोलिसांसमोरही मोठे आव्हान आहे. वाहतूक क्लीअर करण्याचे प्रयत्न वाहतूक पोलिसांकडून केले जात आहेत.
( हेही वाचा: मध्य रेल्वेच्या रेल्वे स्थानकांवर ‘आधार’ )
Join Our WhatsApp Community