अफगाणिस्ताची राजधानी काबूलमधील मशिदीत केलेल्या बाॅम्बस्फोटात आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 40 जण जखमी झाले आहेत. बुधवारी 17 ऑगस्टला खैर खाना परिसरातील मशिदीत लोक नमाज पठाण करत असताना, स्फोट झाला. काबूलमध्ये या स्फोटानंतर दहशतीचे वातावरण आहे. हा स्फोट मगरिबच्या नमाजाच्या वेळी झाला. ज्यामध्ये मशिदीचे इमाम अमीर मोहम्मद काबुली हे देखील ठार झाले. तालिबानचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर, तालिबानचा प्रतिस्पर्धी आयएसने गेल्या काही दिवसांत अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात हल्ले केले आहेत.
( हेही वाचा: खड्ड्यांमुळे मुंबई पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा )
या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. मात्र गेल्या अनेक महिन्यांत असे हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांमध्ये आता एक नवीन गोष्टही समोर आली आहे. आतापर्यंत शिया मशिदींना आईएस या दहशवादी संघटनेकडून लक्ष्य केले जात होते. पण गुरुवारी ज्या भागात हा स्फोट झाला त्या भागात शिया लोकसंख्या नाही.
तालिबानच्या सत्तेनंतर अनेक बाॅम्बस्फोट
अफगणिस्तानमध्ये सध्या तालिबानचे सरकार आहे. अलीकडेच तालिबान सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. अश्रफ घनी यांचे सरकार सत्तेवरुन हटवल्यानंतर, तालिबानने येथे ताबा मिळवला. गेल्या काही महिन्यांत तालिबानमध्ये बाॅम्बस्फोटाच्या अनेक घटना घडल्या आहेत.
Join Our WhatsApp Community