नाशिक मध्यवर्ती कारागृहात १०-१२ कैद्यांचा हल्ला! पोलीस अधिकारी गंभीर जखमी

123

नाशिकमधील मध्यवर्ती कारागृहात एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेल्या १० ते १२ कैद्यांकडून एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सिव्हिल रूग्णालयात उपचार सुरू आहे.

(हेही वाचा – ढाक्कुमाकुम..! ‘मनसे’कडून ‘त्या’ गोविंदा पथकांना मिळणार ‘स्पेन’ वारी)

काय घडला प्रकार

गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात संबंधित कैद्याला आणले होते. पुण्यात येरवडा जेलमध्ये हा कैदी ३०२ च्या गुन्ह्याखाली शिक्षा भोगत आहे. या कैद्यास दुसऱ्या बॅरेकमध्ये जाण्यास बंदी केल्याने त्याने बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला. हल्ला करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव प्रभू चरण पाटील असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळच्या सुमारास कैद्यांची तपासणी सुरू असताना संबंधित कैदी दुसऱ्या बॅरेकमध्ये जात असल्याचे लक्षात येताच यावेळी पोलीस कर्मचाऱ्याने त्याला रोखले. यानंतर पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण करण्यास सूरूवात केली.

यानंतर संबंधित कैद्यासोबत असणाऱ्या दहा ते बारा कैद्यांनी पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. दहा ते बारा जणांच्या घोळक्याने दगड आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याने हा पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला. या प्रकारानंतर कारागृहातील इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गंभीर जखमी झालेल्या कर्मचाऱ्यास सिव्हिल रूग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले. सध्या पोलीस कर्मचाऱ्यावर उपचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.