Indian Currency: ‘मैं धारक को…रुपये अदा करने का वचन देता हूं’, नोटांवर असे का लिहिलेले असते?

127

जर तुम्ही बाजारात काही खरेदी करायला गेलात तर तिथल्या वस्तूंच्या बदल्यात काही रुपये तुम्हाला द्यावेच लागतात. हे पैसे कागदाच्या स्वरूपात असतात. तसेच आपल्या सगळ्यांची इच्छा असते की एक न एक दिवस आपल्याकडे भरपूर पैसा असावा. आपण श्रीमंत व्हावं, यासाठी लोकं आयुष्यभर कष्ट, मेहनत करून पैसे कमवतात. पण तुम्ही कधी या नोटांचे जवळून निरीक्षण केले आहे का? केले असेल तर तुम्हाला प्रत्येक नोटेवर एक वाक्य लिहिलेले दिसेल… कोणतं आहे ते वाक्य तुम्हाला माहित आहे का?

काय लिहिलेले असते नोटेवर?

‘मैं धारक को…रुपये अदा करने का वचन देता हूं’, हे वाक्य 10 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंतच्या नोटांवर लिहिलेले असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? की नोटांवर असे का लिहिलेले असते. त्याचा अर्थ काय असेल… जर ते लिहिलेले नसेल तर काय होऊ शकते? वाचा सविस्तर…

(Indian Currency: नोटांवर का असतात ‘या’ तिरक्या रेषा? तुम्हाला माहितीये का? वाचा…)

भारतातील सर्व नोटा बनवण्याची आणि वितरित करण्याची जबाबदारी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ची आहे. धारकाला विश्वास देण्यासाठी रिझर्व्ह बँक हे वचन नोटवर लिहिते. याचा अर्थ तुमच्याकडे जी नोट आहे, त्याच मूल्याचे सोने आरबीआयकडे राखीव आहे. म्हणजेच 100 किंवा 200 रुपयांच्या नोटेसाठी धारकावर 100 किंवा 200 रुपयांचे दायित्व असल्याची हमी असल्याचे सांगितले जात आहे.

या नोटेवर RBI गव्हर्नरची स्वाक्षरी नसते

भारतात 1 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंतच्या नोटा चलनात आहेत. या सर्व नोटांच्या मूल्यासाठी आरबीआय गव्हर्नर जबाबदार आहेत. एक रुपयाची नोट वगळता इतर सर्व नोटांवर RBI गव्हर्नरची सही असते. तर एक रुपयाच्या नोटेवर भारताच्या वित्त सचिवांची स्वाक्षरी असते.

जर तुम्ही कधी भारतीय नोट पाहिली असेल, तर तुम्हाला नोटांवर बाजूला तिरकस रेषा दिसतील. पण तुम्हाला माहीत आहे का, या तिरकस रेषा नोटेवर का दिल्या जातात? नोटांवरील या तिरकस रेषा त्या ठराविक नोटेबद्दल खूप काही सांगून जातात. म्हणून, या तिरकस रेषा 100 रूपयांपासून ते 2000 रूपयांच्या सर्व नोटांवर छापलेल्या दिसतात.

note 2

…म्हणून सर्व नोटांवर या तिरकस रेषा असतात

नोटेच्या किंमतीनुसार या तिरकस रेषांची संख्या देखील वाढते. या तिरकस रेषांना ‘ब्लीड मार्क्स’ असे म्हणतात. हे ब्लीड मार्क्स खास अंध, दिव्यांग व्यक्तींसाठी बनवलेले आहेत. ज्यांना दिसत नाही, त्यांच्या हातात किती रुपयांची नोट आहे, हे त्यांना या नोटेला स्पर्श करून सहज कळू शकते. दरम्यान, या वेगवेगळ्या नोटांवर त्यांच्या किंमत, मुल्यानुसार वेगवेगळ्या तिरकस रेषा दिलेल्या दिसतात आणि याच कमी-जास्त रेषांमुळे अंध व्यक्तींना ती नोट किती रूपयांची आहे हे समजते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.