तिवरे धरण खेकड्यामुळे फुटले, असे वक्तव्य केल्यामुळे फडणवीस सरकारच्या काळात मंत्री पद गमवावे लागलेल्या तानाजी सावंत यांना शिंदे – फडणवीस सरकारच्या काळात पुन्हा मंत्री पद मिळाले, गुरुवारी पावसाळी अधिवेशनात दुसऱ्या दिवशी विधान परिषदेत एकनाथ खडसे यांनी तानाजी सावंत यांना पुन्हा खेकड्याच्या वक्तव्याची आठवण करून दिली, त्यावर मंत्री सावंत यांनी धरणे खेकड्यामुळे फुटतात, तिवरे धरणही त्यामुळे फुटले, याचा पुनरुच्चार केला.
( हेही वाचा : ‘उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील अजितदादांचे सरकार’; फडणवीसांची विधानसभेत टोलेबाजी)
अतिवृष्टीमुळे आणि शेतकरी यांना मदत याविषयावर विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर विधान परिषदेत चर्चा सुरू होती, त्यावर एकनाथ खडसे बोलत होते, तेव्हा मंत्री तानाजी सावंत यांनी त्यावर मिश्किल टिपण्णी केली असता खडसे यांनी मंत्री तानाजी सावंत यांना त्यांच्या खेकड्याच्या वक्तव्याची आठवण करून दिली. त्यावर मंत्री सावंत यांनी सभागृहात यावर भूमिका मांडली.
काय म्हणाले मंत्री सावंत?
मंत्री सावंत म्हणाले, तिवरे धरण हे खेकड्यामुळे फुटले हे मी वक्तव्य केले होते आणि आजही त्यावर ठाम आहे. मी अभियंता आहे. पाझर तलाव, धरणे यावर झाडे उगवतात त्यांची मुळे खोलवर जातात त्यामुळे भेगा निर्माण होतात, तसेच जसा उन्हाळा वाढतो, तसे खेकड्याच्या प्रजाती या अधिक ओलाव्यासाठी खोलवर जात असतात आणि त्यामुळे पाझर तलाव आणि धरण पोकळ बनतात, जेव्हा पाऊस जोरदार सुरू होतो, तेव्हा धरणे फुटतात, असे मंत्री सावंत म्हणाले.
Join Our WhatsApp Community