राज्याला ‘यूपीए’च्या तुलनेत ‘मोदी’ सरकारकडून भरीव आर्थिक मदत – प्रवीण दरेकर

147

राज्यात आधीच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या घोषणा केल्या पण त्यातील बराचसा निधी अखर्चित राहिला. मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांना भरघोस मदत केली होती. राज्याला मोदी सरकारकडूनही मोठी आर्थिक मदत मिळाली आहे, यूपीएकडून त्या तुलनेत राज्याला तेवढी मदत झालेली नाही. त्यामुळे मोदी सरकार महाराष्ट्राशी दूजाभाव करत आहे, असे म्हणणे चुकीचे आहे, असे मत आमदार प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत मांडले.

(हेही वाचा – दहीहंडीला खेळाचा दर्जा! पुढील वर्षापासून ‘प्रो गोविंदा’ स्पर्धा; मुख्यमंत्र्यांची घोषणा)

केंद्रावर आगपाखड करून मदत मिळत नाही

अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांना मदत या विषयावरील विरोधी पक्षांच्या प्रस्तावावर बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, यूपीए सरकारने २०१० साली ७५३ कोटी रुपये मदत दिली होती, मात्र तेव्हा सरकारचा ९७२ कोटी खर्च झाला होता, २०१० ते २०१४ या कालावधीत यूपीएने एकूण ७,५८२ कोटी मदत केली, तर राज्याचा खर्च मात्र १७,०३८ कोटी झाला होता. तर मोदी सरकारने २०१५ मध्ये ३ हजार ७४ कोटी दिले, तर खर्च ४,२९३ हजार कोटी झाला, २०२० मध्ये मोदी सरकारने ४,७१३ कोटी दिले होते तेव्हा खर्च ३,७२८ कोटी झाले आहेत. त्यामुळे मोदी सरकारकडून यूपीएच्या तुलनेत राज्याला मोठी मदत झाली आहे, त्यामुळे वारंवार केंद्रावर आगपाखड करून उपयोगाचे नाही, असे प्रवीण दरेकर म्हणाले.

मुख्यमंत्र्याच्या दिल्ली दौऱ्याने पोटदुखी का होते?

सध्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, याचा आपल्याला अभिमान आहे. ते ५-७ वेळा दिल्लीला गेले म्हणून टीका होत आहे, ते दिल्लीला राज्याच्या विकासासाठी गेले आहेत. शिंदे हे तुमचेच मंत्री होते, आज ते मुख्यमंत्री आहेत, आपल्यातला कुणी सहकारी मुख्यमंत्री झाला आहे, याचा अभिमान वाटला पाहिजे, शिंदे – फडणवीस जोडगोळी राज्याच्या विकासासाठी काम करत असताना विरोधकांना पोटदुखी का होत आहे, असेही दरेकर म्हणाले.

… तर शिंदेंना महाराष्ट्रात फिरू दिले नसते

शिंदेंना गद्दार म्हणत आहेत तेच काल त्यांच्यासाठी खुद्दार होते. ५२ पैकी ४० आमदार बाळासाहेबांच्या विचारांसाठी विशिष्ट भूमिका घेतात तेव्हा ते गद्दार ठरत नाही. नाही तर शिंदे यांना महाराष्ट्रात फिरू दिले नसते. आज त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव होत आहे, असेही दरेकर म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.