मध्य रेल्वेच्या मुंबई विभाग दिनांक २० आणि २१ ऑगस्ट (शनिवार/रविवार रात्री) रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक असणार आहे.
मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
भायखळा – माटुंगा जलद मार्गावर मेगाब्लॉक
- २० ऑगस्ट रात्री ११.३० ते २१ ऑगस्ट पहाटे ४.३० पर्यंत जलद मार्गावर मेगाब्लॉक.
- रविवारी सकाळी १२.४० ते ०५.४० पर्यंत जलद मार्गावर मेगाब्लॉक.
- ठाणे येथून २० ऑगस्ट २०२२ रोजी रात्री १०.५८ आणि ११.१५ वाजता सुटणाऱ्या जलद मार्गावरील गाड्या माटुंगा आणि भायखळा दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील, त्यांच्या नियोजित थांब्यांनुसार थांबतील.
मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे डायव्हर्जन
- 12051 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस भायखळा आणि माटुंगा स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. दादर प्लॅटफॉर्म क्रमांक १ येथे या गाडीला दुहेरी थांबा दिला जाईल, रोहा येथे गाडी १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचेल.
- 11058 अमृतसर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस, 11020 भुवनेश्वर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस आणि 12810 हावडा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नागपूर मार्गे मेल, माटुंगा आणि भायखळा स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्यांना दादर प्लॅटफॉर्म क्रमांक ३ थांबा दिला जाईल.
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.४० पर्यंत मेगाब्लॉक.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.
- पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.
विशेष गाड्या
- ब्लॉक कालावधीत पनवेल – कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) विभागात विशेष लोकल अंदाजे २० मिनिटांच्या वारंवारतेने धावतील.
- हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी असेल.
हे मेंटेनन्स मेगाब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
Join Our WhatsApp Community