शिंदे-फडणवीस सरकारचं विधीमंडळ अधिवेशन सुरु आहे. अडीच वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर महाविकास आघाडीला पुन्हा एकदा विरोधी बाकावर बसावं लागलं आहे. त्यामुळे आता या सरकारला धारेवर धरण्याची त्यांना आयती संधी हवी आहे. अजून तरी ती संधी त्यांना सापडलेली नाही. म्हणून सध्या वैयक्तिक टीका करुन काम भागवलं जात आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधानभवनाच्या परिसरात घोषणाबाजी केली.
( हेही वाचा : महान ज्योतिर्भास्कर मोहित कंबोज यांची नवी भविष्यवाणी खरी ठरेल? )
शिंदेंच्या आमदारांना गद्दार म्हणत होते की स्वतःलाच गद्दार म्हणत होते
शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार विधानभवनात येत असताना, ‘आले रे आले, गद्दार आले’ अशी घोषणाबाजी करण्यात आली. यामध्ये ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षाचे नेते सहभागी झाले होते. गंमत अशी आहे की शिवसेना आणि भाजपा हे जुने मित्र. त्यांच्यात एक राजकीय करार झालेला आहे. ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री. आता भाजपाला शिवसेनेपेक्षा जवळजवळ दुप्पट जागा मिळाल्या असताना, ते आपली मुख्यमंत्रीपदाची खुर्ची का सोडतील?
राज ठाकरे यांनी देखील या कराराबद्दल सांगितलं आहे. जेव्हा भाजपाला कमी जागा असायच्या तेव्हा भाजपाने कधीच मुख्यमंत्रीपदाचा दावा सांगितला नाही आणि त्यांनी शिवसेनेची साथ सोडून दुसर्या पक्षाशी युती केली नाही.
दुसरी गोष्ट राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष मुळातच कॉंग्रेस पक्ष फोडून निर्माण झालेला आहे आणि कॉंग्रेसचा इतिहास पाहिला तर कॉंग्रेसने अनेक सरकार पाडली आहेत. त्यामुळे ज्यावेळी शिंदेंच्या शिवसेनेला उद्देशून या विरोधकांनी गद्दार म्हटलं, तेव्हा ते शिंदेंच्या आमदारांना गद्दार म्हणत होते की स्वतःलाच गद्दार म्हणत होते असा प्रश्न उपस्थित राहतो.
Join Our WhatsApp Community