मध्य रेल्वेची वाहतूक शुक्रवारी पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेसचे इंजिन भिवपुरी स्टेशनजवळ बंद पडल्याने मध्य रेल्वेची कर्जत आणि पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. ही एक्स्प्रेस बंद पडल्यामुळे मध्य रेल्वेच्या लोकल वाहतुकीला देखील बसला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवरील लोकल वाहतूकही विस्कळीत झाली आहे. दरम्यान पर्यायी इंजिनाची व्यवस्था करुन सिंहगड एक्स्प्रेस पुण्याच्या दिशेने रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे.
सिंहगड एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड
मुंबईहून पुण्याला जाणा-या सिंहगड एक्स्प्रेसचे इंजिन भिवपुरू स्टेशनजवळ बंद पडले. संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून हे इंजिन बंद पडल्याने मध्य रेल्वेची कर्जतकडे जाणारी वाहतूक तब्बल पाऊण तास ठप्प झाली होती. दरम्यान पर्यायी इंजिनाची व्यवस्था करुन एक्स्प्रेसला मार्गस्थ करण्यासाठी इंजिन रवाना करण्यात आले आहे.
(हेही वाचाः जम्मू-काश्मीरमध्ये 25 लाख नवे मतदार, काय आहे कारण?)
लोकल सेवेलाही फटका
पण या बिघाडाचा फटका लोकल वाहतुकीला देखील बसला आहे. कर्जतच्या दिशेने जाणा-या लोकल गाड्या या उशिराने धावत असल्याची माहिती मिळत आहे. पुढील तासाभरात लोकल सेवा सुरळीत होईल, असे कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशचे सचिव प्रभाकर गंगावणे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community