गडचिरोली जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांना वितरित करण्याकरिता निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवठा केल्याप्रकरणी योग्य ती चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात येईल. तसेच याबाबत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी विधानपरिषदेत सांगितले.
( हेही वाचा : महापालिका मुलांच्या गणवेषाचा प्रस्ताव मंजूर, आता निधी हस्तांतरणासाठी प्रशासनाची धावाधाव )
दोषींवर नियमानुसार योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश
गडचिरोली जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांना वितरित करण्याकरिता निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरविण्यात येत असल्याबाबत सदस्य डॉ. परिणय फुके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली.
जिल्हा प्रशासनाकडून अहवाल प्राप्त झाला असून या प्रकरणातील दोषींवर नियमानुसार योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच याबाबत लवकरच बैठक घेण्यात येईल, असेही अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानपरिषदेत सांगितले. या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला.
Join Our WhatsApp Community