Dolo 650 गोळ्यांची विक्री वाढवण्यासाठी कंपनीकडून डॉक्टरांना 1000 कोटींचे गिफ्ट

155

कोरोना काळात DOLO 650 गोळी चर्चेत आली. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या या DOLO 650 या कंपनीविरोधात एक जनहित याचिका दाखल करत एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. डोलो 650 गोळ्यांची विक्री वाढवण्यासाठी कंपनीने डाॅक्टरांना 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गिफ्ट दिल्याचा दावा याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात केला आहे. कोरोना रुग्णांच्या प्रिस्क्रिप्शनवर डोलो 650 या गोळीचे नाव लिहिण्यासाठी कंपनीने देशभरातील डाॅक्टरांना 1000 कोटी रुपयांचे गिफ्ट दिल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सात दिवसांत उत्तर मागितले आहे.

फेडरेशन ऑफ मेडिकल अॅण्ड सेल्स रिप्रेजेंटेटिव्ह असोसिएनशकडून वकील संजय पारिख यांनी न्यायालयात म्हटले की, तापाच्या रुग्णांना उपचारासाठी डोलो 650 या गोळीचा सल्ला देण्यासाठी डाॅक्टरांना तब्बल एक हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचे गिफ्ट दिले. औषधांच्या फाॅर्म्युलेशनवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक वैधनिक फ्रेमवर्क असणे आवश्यक आहे, असे पारिख यांनी म्हटले आहे.

( हेही वाचा: मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट! सलग २ दिवस असणार मेगाब्लॉक )

न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी व्यक्त केले आश्चर्य

संजय पारिख यांची बाजू ऐकल्यानंतर, न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले की, तुम्ही जे म्हणताय ते ऐकायला चांगले वाटत नाही. ही तीच गोळी आहे. जी कोरोना काळात मी घेतली होती. ही गोळी घेण्याचा सल्ला मला डाॅक्टरांनी दिला होता. जर हे खरं असेल तर ही गंभीर बाब असल्याचे, चंद्रचूड म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.