मुंबईतील बोरिवली पश्चिम भागात साईबाबा नगर येथे असणारी गितांजली नावाची चार मजली इमारत कोसळल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना घडल्याचे समजताच अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून इमारतीच्या ढिगाऱ्याखाली १० ते १५ जण अडकल्याची शक्यता वर्तविली जात आहे. अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी रवाना झालं असून वेगाने बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.
(हेही वाचा – नियम मोडणं दहीहंडी आयोजकांना पडणार भारी! दाखल होणार गुन्हा, काय आहे नियम?)
Maharashtra | A four-storey building collapsed in Saibaba Nagar of Borivali West in Mumbai. Details awaited: Fire Brigade
— ANI (@ANI) August 19, 2022
बोरिवलीतील साईबाबा नगरमधील गितांजली नावाची ही इमारत आहे. तळमजला आणि तीन मजले अशी ही चार मजली इमारत आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून अधिक तपास सुरू करण्यात आला असल्याची माहिती मिळते आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी १२ वाजून ३४ मिनिटांनी ही चार मजली इमारत कोसळली. ही घटना घडताच अग्मिशमन दलाला लेव्हल २ चा कॉल मिळाला होता. ही इमारत जुनी असल्याचे सांगितले जात असून, ती धोकादायक घोषित करण्यात आली होती का? याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून, ढिगारा बाजूला करून बाचाव आणि मदतकार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community