दोन वर्षांनंतर राज्यात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. दहीहंडी सणासाठी मुंबईत ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामुळे काही ठिकाणी वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेले आहेत. बेस्ट बसचे काही मार्ग बदलण्यात आले असून काही मार्ग १९ ऑगस्टपर्यंत खंडित करण्यात आले आहेत. याविषयी संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे…
( हेही वाचा : बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! थकित देणी गणेशोत्सवाआधी देण्याचे मुख्यमंत्र्याचे निर्देश )
बेस्ट मार्गातबदल तर काही मार्ग खंडित
- बस मार्ग क्रमांक ए २९८ मार्ग रावळपाडा मार्केट पर्यंत खंडित करण्यात आला आहे.
- ९० फूट रोडवर दहीहंडी निमित्त स्टेज बांधल्यामुळे बस मार्ग क्रमांक १७६ चे अप दिशेत परावर्तन कुंभारवाडा येथून सरळ सायन हॉस्पिटल असे केले आहे.
- कबूतर खाना ते दादर रेल्वे स्टेशन (प) च्या दरम्यान दहीहंडी निमित्त स्टेज बांधल्यामुळे बस मार्ग क्रमांक ए ११८ सकाळी ६.००वाजल्यापासून कबूतर खाना येथे खंडित करण्यात आला आहे.
- भाईंदर येथे दहीहंडी उत्सवामुळे बस मार्ग क्रमांक 718 गोल्डन नेस्ट येथे 10.30 वाजल्यापासून खंडित करण्यात आला आहे.
- वसंत विहार ठाणे येथे दहीहंडीचा स्टेज बांधल्यामुळे बस मार्ग क्रमांक 484 अप डाऊन दोन्ही दिशेमध्ये वसंत विहार येथून आंबेडकर चौकातून डावे वळण घेऊन वसंत विहार मार्गाने पवार नगर कडे जातील .
- अंधेरी घाटकोपर लिंक रोड- श्रेयस येथे दहीहंडीच स्टेज बांधल्यामुळे बस मार्ग क्रमांक ४१६ लालबहादूर शास्त्री मार्ग ,कमांडर दत्ताजी साळवी मार्ग येथे डावे वळण घेऊन अमृत नगर कडे जातील व बस मार्ग क्रमांक ४१० विक्रोळी आगाराकडे जाईल.
- चुनाभट्टी टाटानगर येथे दहीहंडी उत्सवाकरिता स्टेज बांधल्यामुळे बस मार्ग क्रमांक 5,355,85 हे बस मार्ग वसंतराव नाईक मार्गाने 12.00 वाजल्यापासून वळविण्यात आले आहेत.
- ठाकूर सिनेमा ते मर्क्युरी बिल्डिंग च्या दरम्यान दहीहंडी निमित्त स्टेज बांधल्यामुळे बस मार्ग क्रमांक ए २८७,६२९ हा ठाकूर सिनेमा येथे सकाळी ५.०० वाजल्यापासून खंडित करण्यात आला आहे.