Reserve bank of India ने 3 महिन्यांत रेपो दर 1.4 टक्क्यांनी वाढवला आहे. त्याचा फटका गृहकर्ज घेणा-या ग्राहकांना बसला आहे. 2019 च्या तुलनेत गृहकर्जाचे व्याज दर अजून 1 टक्क्याने कमी आहे. त्यामुळे अमेरिकी फेडरल रिझर्व्ह जितक्या वेळा व्याज दर वाढवेल. तितक्या वेळा रिझर्व्ह बॅंकही रेपो दरात वाढ करु शकते. त्याच प्रमाणात गृहकर्जाचा ईएमआय वाढत जाईल. अशा परिस्थितीत ईएमआयचे ओझे डोईजड होऊ शकते. EMIचे ओझे कमी करण्यासाठी 3 उपाय काय ते पाहू…..
कर्ज अवधी वाढवून घ्या
आपल्या कर्जाचा कालावधी वाढवून ईएमआय कमी केला जाऊ शकतो. त्यासाठी बॅंकेला कर्जाचे रिशेड्युलिंग करायला सांगावे. मात्र, कालावधी वाढल्यामुळे व्याजात अधिक पैसा जाईल. ज्यांच्यावर एकाचवेळी अनेक कर्जे आहेत, त्यांच्यासाठी हा पर्याय चांगला आहे.
स्वस्त कर्ज शोधा
स्वस्त कर्ज देणा-या बॅंकेकडे कर्ज हस्तांतरित करुन EMI कमी केला जाऊ शकतो. 20 वर्षांसाठी 75 लाख रुपयांचे कर्ज घेतले असल्यास, तसेच त्याच्या व्याजात 50 आधार अंकाची कपात झाल्यास कर्जदाराचे 5.5 लाख रुपये वाचतात. त्यामुळे दिर्घकालीन कर्जासाठी दुसरी बॅंक शोधणे फायदेशीर ठरु शकते.
डिफरमेंट घेऊ शकता
ग्राहक कर्जाचा डिफरमेंटचा पर्यायही निवडू शकतात. यात तुम्ही काही कालावधीसाठी मुद्दल तशीच ठेवून केवळ व्याज भरु शकता. यात मुद्दल तशीच शिल्लक राहत असल्यामुळे कर्जदारास आर्थिक फटका मात्र बसतो. कारण डिफरमेंट कालावधीत थकीत रकमेवर साधारण व्याज द्यावे लागते. हा फारच मोठ्या आर्थिक संकटाच्या काळात वापरायचा पर्याय आहे.
( हेही वाचा: केंद्राची मोठी कारवाई; ७ भारतीय तर, एका पाकिस्तानी YouTube चॅनेलवर बंदी )
असे वाढेल व्याज
- तुम्ही 15 वर्षांपासून 6.5 टक्के दराने 50 लाख रुपयांचे कर्ज घेतले असल्यास, ईएमआय 43 हजार 555 रुपये येतो. रेपो दरात 1.4 टक्के वाढ झाल्याने, व्याज दर 7.9 टक्के होईल.
- त्यामुळे EMI वाढून 47 हजार 494 रुपये होईल. कर्जाचा कालावधी 15 वर्षांपासून 20 वर्षे केल्यास 7.9 टक्के व्याज दराने हप्ता घटून 41 हजार 511 रुपये होईल. मात्र, व्याजात जाणारी तुमची रक्कम 35.5 लाखांवरुन वाढून 49.6 लाख रुपये होईल.