दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या विरोधात सीबीआयने केला गुन्हा दाखल

124

दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. मद्य घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सिसोदिया यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.

सीबीआयकडून छापेमारी

दिल्लीतील अबकारी धोरणातील अनियमिततेप्रकरणी राजधानी दिल्लीसह 7 अन्य राज्यांमधील 21 ठिकाणी सीबीआयने छापेमारी केली होती. यावेळी उपमुख्यमंत्री सिसोदिया यांच्या घरावरही धाड टाकली. यावेळी सिसोदिया यांच्या घरातून आक्षेपार्ह दस्तऐवज आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. या सर्व गोष्टींची तपासणी करण्यात येत असून सिसोदिया यांची देखील चौकशी सीबीआयकडून करण्यात येत आहे.

सिसोदियांनी फेटाळले आरोप

दरम्यान, या प्रकरणात सीबीआयने 15 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी सिसोदिया यांचा आरोपी क्रमांक 1 असा उल्लेख करण्यात आला असून त्यांच्यावर पीसी अधिनियम 1988 अंतर्गत 120बी,477ए याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी अबकारी आयुक्त ई.गोपीकृष्ण,चार लोकसेवक आणि इतर काही जणांच्या घरावरही यावेळी सीबीआयने छापेमारी केली आहे. सिसोदिया यांनी मात्र आपल्यावरील आरोप खोटे असल्याचे सांगत तपास यंत्रणा केंद्राच्या इशा-यावर काम करत असल्याचे म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.