मुंबईत पुन्हा २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी, वाहतूक नियंत्रण कक्षाच्या व्हाॅट्सअॅपवर आला मेसेज

180
ऐन सणासुदीच्या दिवसात मुंबईला पुन्हा एकदा आतंकवादी संघटनेकडून लक्ष्य केले जात आहे. मुंबईत २६/११सारखा हल्ला करणार असल्याची धमकी मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाच्या व्हाॅट्सअॅपवर वर देण्यात आली आहे. या धमकीमुळे खळबळ उडवून उडाली असून,  वाहतूक पोलिसांसह मुंबई पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाच्या व्हाट्सअॅपवर शुक्रवारी अज्ञात व्यक्तीकडून एक संदेश पाठवण्यात आला. या संदेशात मुंबईत पुन्हा एकादा २६/११ सारखा हल्ला करणार असल्याची धमकी देण्यात आली. ट्रॅफिक पोलिसांना आलेला संदेश हा पाकिस्तानी क्रमांकावरून आल्याची माहिती आहे, मात्र पोलिसांनी अद्याप याबाबत काहीही  स्पष्ट वक्तव्य केलेले नाही. या हल्ल्यासाठी भारतातील  ६ जणांची मदत घेतली जाणार असल्याचे म्हटले आहे. या धमकीवजा संदेशने मुंबईत खळबळ उडाली असून ऐन सणासुदीच्या काळात आलेल्या या धमकीला सुरक्षा यंत्रणेने गंभीरतेने घेतले आहे. त्या अनुषंगाने मुंबईतील सुरक्षा यंत्रणा, पोलीस यंत्रणाना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हा संदेश पाठवून खोडसाळपणा करण्यात आला असावा, अशी शक्यता वर्तवली जात असली तरी त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नसल्याचे अधिका-यांचे म्हणणे आहे. मुंबईत सर्वत्र सुरक्षा वाढवण्यात आलेली असून समुद्र किनारे, संशयित वाहने, लॉजेस, हॉटेल  यांची तपासणी केली जात आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.