दिलबाग सिंगच्या गाडीत बॉम्ब लावणाऱ्याला शिर्डीमधून अटक

126

पंजाबचे पोलीस अधिकारी दिलबाग सिंग यांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या तिसऱ्या आरोपीला महाराष्ट्रीतील शिर्डीतून अटक करण्यात आली आहे. राजेंद्र सिंग असे या आरोपीचे नाव असून पंजाब पोलिसांनी महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने त्याला अटक केली आहे. यापूर्वी दोन आरोपींना दिल्लीतून अटक करण्यात आली होती. या आरोपींनी दिलबाग सिंग यांच्या गाडीखाली आयईडी बॉम्ब लावला होता.

यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार, पंजाबचे पोलीस अधिकारी दिलबाग सिंह यांच्या कारमध्ये 16 ऑगस्ट रोजी आयईडी बॉम्ब पेरण्यात आला होता. या घटनेचा एक सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला होता. ज्यामध्ये दोन अज्ञात मोटरसायकलस्वारांनी त्यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या कारखाली स्फोटके पेरल्याचे स्पष्टपणे दिसून आले होते. या प्रकरणी दोन आरोपींना दिल्ली विमानतळावरून अटक करण्यात आली होती. हे दोघेही परदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. दिलबाग सिंह हे दहशतवादविरोधी कारवायांमध्ये खूप सक्रिय आहेत आणि कदाचित याच कारणामुळे त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. यात पांढरे कुर्ते घातलेले दोन अनोळखी लोक कारच्या तळाशी बॉम्ब ठेवताना दिसून आले आहेत. या घटनेपूर्वीही दिलबाग सिंह यांना अनेकदा धमक्या आल्या होत्या आणि त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली होती.

( हेही वाचा: school bus accident: स्कूल बस आणि ट्रकचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू ,10 विद्यार्थी जखमी )

आरोपी पंजाब पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणी एडीजीपी आर.एन. ढोके यांनी सांगितले की, या बॉम्बमध्ये सापडलेल्या आयईडीचे वजन सुमारे अडीच किलो आहे. तरनतारण येथून जप्त करण्यात आलेला आणि पाकिस्तानमधून आलेला हा आयईडी आहे. या प्रकरणाचा आम्ही दहशतवादाच्या अँगलनेदेखील तपास करत आहोत. या प्रकरणी तपासासाठी अनेक पथके तैनात करण्यात आली आहेत, असं त्यांनी सांगितले. दिलबाग सिंह हे एक क्षमतावान अधिकारी आहेत. त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे. आम्ही त्यांच्या सुरक्षेत वाढ करत असल्याचे ढोके यांनी सांगितले. दरम्यान शिर्डी येथून पकडण्यात आलेल्या तिसऱ्या आरोपीला पंजाब पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.