भर रस्त्यात एसटीचे ब्रेक फेल झाले, चालकाने दाखवले प्रसंगावधान आणि…

146

महाराष्ट्राच्या कानाकोप-यात एसटीने असंख्य प्रवाशी दररोज प्रवास करत असतात. अहोरात्र एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी धावत असते. पण अनेकदा काही तांत्रिक बिघाडामुळे एसटीतील प्रवाशांच्या जीवालाही धोका उद्भवल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

अशीच एक घटना शनिवारी राष्ट्रीय महामार्गावरील वाशिम-मंगरुळपीर दरम्यान घडली आहे. एसटीची बसचे ब्रेक फेल झाल्याने बसमधील 50 प्रवाशांच्या जीव धोक्यात होता. पण चालकाच्या प्रसंगावधानाने या सर्व प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.

असा टळला अपघात

बडनेरा आगाराची एमएच-12 ईएफ 6339 क्रमांकाची ही बस हिंगोलीहून अमरावतीला जात होती. शनिवारी दुपारी 1.30 वाजता ही बस वाशिम-मंगरुळपीर मार्गे अमरावतीकडे जात होती. राष्ट्रीय महामार्गावर कळंबा महालीनजिक बसचा वेग कमी करताना बसचे ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे मोठा अपघात टाळण्यासाठी चालकाने प्रसंगावधान राखत गिअरवर नियंत्रण मिळवत बस रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. या बसमधील सर्व 50 प्रवाशी सुखरुप आहेत.

(हेही वाचाः Income Tax च्या नियमांत बदल, करदात्यांना मिळणार मोठा दिलासा)

अलिकडेच 10 ऑगस्ट रोजी यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील एसटी आगाराची बस गडचांदूरकडे प्रवाशांना घेऊन जात असताना अचानक एसटी बसची मागील दोन चाक निघाली आणि ते नदीत पडले. मात्र या बसच्या चालकाने प्रसंगवधान दाखवत बसमधील सर्व प्रवाशांचे प्राण वाचवले होते. यामुळे या बसमधील 18 प्रवाशांचे प्राण वाचले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.