पैसे दुप्पट करायचेत ? वाचा काय सांगतात तज्ज्ञ

130

सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ( systematic Investment plan) अर्थात एसआयपीच्या माध्यमातून छोट्या छोट्या रकमा म्युच्युअल फंड अथवा अन्य बचत योजनांत नियमितपणे गुंतवल्यास दीर्घ कालावधीत मोठी रक्कम उभी केली जाऊ शकते. गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते, थेट समभागांत ( Equity Shares) पैसे लावण्याच्या तुलनेत हा एक सुरक्षित पर्याय आहे. एसआयपी टाॅप- अपमध्ये दरवर्षी केवळ 10 टक्के वाढ केली तरी गुंतवणूकदारास दुप्पट परतावा मिळू शकतो.

किती पैसे जमवायचे आपल्या हाती

एसआयपीची चांगली बाब ही आहे की, पाहिजे तेव्हा एसआयपी रक्कम कमी जास्त करु शकता. हा पर्याय प्लॅन सुरु करण्याच्या आधीच निवडायचा असतो. सॅलरी अथवा उत्पन्नात वाढ झाल्यास एसआयपीची रक्कम वाढवणे सोपे होते. यातून मॅच्युरिटीवेळी नियमित एसआयपीपेक्षा सुमारे दुप्पट परतावा मिळतो.

नेमके गणित काय?

  • एसआयपी टाॅप- आयच्या माध्यमातून दरवर्षी 10 टक्के गुंतवणूक वाढवल्यास, 20 वर्षांत गुंतवणुकीत 22.37 लाख रुपयांची वाढ होताना दिसत आहे. तथापि, परतावा पाहिल्यास नियमित एसआयपीच्या तुलनेत तो तब्बल 44 लाख रुपये अधिक आहे.
  • म्हणजेच गुंतवणुकीत दरवर्षी केवळ 10 टक्के वाढ केल्यानंतर, नियमित एसआयपीच्या तुलनेत एसआयपी टाॅप- अपद्वारे मिळणारा लाभ दुप्पट जास्त आहे.

( हेही वाचा: ATMच्या शोधाची भन्नाट कहाणी )

गुंतवणूक वाढवण्याची सोय

एखादी व्यक्ती 20 वर्षांसाठी गुंतवणूक करत असेल आणि त्याने दरवर्षी टाॅप-अपच्या माध्यमातून केवळ 10 टक्के गुंतवणूक वाढवली असेल, तर त्यास नियमित एसआयपीच्या तुलनेत दुप्पट परतावा मिळेल. म्युच्युअल फंड कंपन्या एसआयपी टाॅप- अपचा पर्याय वेळोवेळी मासिक गुंतवणूक वाढवण्यासाठी देत असतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.