भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भाजप आमदार आशिष शेलार हे आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला आशिष शेलार यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस हे बाळासाहेबांच्या नावाने मते मागत असून आता मोदींचे पर्व संपत असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्याला शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आपण घरात बंद खोलीत बसून राहिलो की आपल्याला जग संपल्यासारखेच वाटते, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
आशिष शेलार यांचे ट्वीट
हिंदुत्वाचा ज्वलंत विचार जगणाऱ्या वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न त्यांच्या मा. सुपुत्रांना पुर्ण करण्यास जमले नाही, म्हणून त्यांना वंदनीय मानणाऱ्यांनी ते पूर्ण करु नये का? ते इतरांनी पूर्ण केले म्हणून त्यांच्या मुलांनी एवढे चिडावे का?, असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.
हिंदुत्वाचा ज्वलंत विचार जगणाऱ्या वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न त्यांच्या मा. सुपुत्रांना पुर्ण करण्यास नाही जमले… म्हणून त्यांना वंदनीय मानणाऱ्यांनी ते पुर्ण करु नये का?
ते इतरांनी पुर्ण केले म्हणून त्यांच्या मुलांनी एवढे चिडावे का?
1/3— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 20, 2022
त्यासाठी मोठे मन लागते
आपल्या वडिलांच्या विचारांनी झपाटून समाजातील लोक, आयुष्य खर्च करुन आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करतात, याचा त्यांच्या सुपुत्रांना आनंदच व्हायला हवा ना? पेला अर्धा भरला आहे, असेही म्हणता येते पेला अर्धा रिकामा असेही म्हणता येते! फक्त भरला आहे म्हणायला मोठे मन लागते, अशी टीकाही आशिष शेलार यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंवर केली आहे.
आपल्या वडिलांच्या विचारांनी झपाटून समाजातील लोक, आयुष्य खर्च करुन आपल्या वडिलांचे स्वप्न पुर्ण करतात…
याचा, त्यांच्या सुपुत्रांना आनंदच व्हायला हवा ना?
पेला अर्धा भरला आहे, असेही म्हणता येते पेला अर्धा रिकामा असेही म्हणता येते!
फक्त
भरला आहे म्हणायला मोठे मन लागते!
2/3— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 20, 2022
बंद खोलीत राहिलो की जग संपल्यासारखे वाटते
उरला प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पर्व संपत आले म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव भाजप वापरते असे जे मा. सुपुत्रांना वाटतेय, हे म्हणजे अती झाले आणि हसू आले. पण काय करणार? आपण घरात बंद खोलीत बसून राहिलो की, बाहेरचे विशाल जग संपल्यासारखे वाटायला लागतेच, असा खोचक टोलाही आशिष शेलार यांनी लगावला आहे.
Join Our WhatsApp Community