हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये पावसाचा हाहाकार; भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, अनेक लोक बेपत्ता

150

हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दोन्ही राज्यांमध्ये पाऊस, भूस्खलन आणि ढगफुटीच्या विविध घटनांमध्ये २२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २० लोक बेपत्ता आहेत. मंडी जिल्ह्यात सर्वाधिक १० लोकांचा मृत्यू झाला आहे. हिमाचलमध्ये सर्वाधिक मृत्यू भूस्खलनामुळे झाले आहेत.

( हेही वाचा : जगभरातील ग्राफिक्स डिझाईनरच्या नोकऱ्या धोक्यात? काय आहे AI Image Generator जाणून घ्या…)

हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये पावसाचा हाहाकार; महामार्ग ठप्प

मंडी, चंबा, कांगडा, हमीरपूर आणि शिमला जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यंदा हिमाचलमध्ये 316 टक्के पावसाची नोंद झाल्याची माहिती महसूल प्रधान सचिव ओंकार शर्मा यांनी दिली. गेल्या १८ वर्षांतील हा सर्वाधिक पाऊस आहे. केवळ २०१० आणि २०१८ मध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी मुसळधार पावसामुळे ७४२ रस्ते, दोन राज्य महामार्ग आणि एक राष्ट्रीय महामार्ग बंद आहे. मंडी झोनमध्ये सर्वाधिक ३५२, शिमला झोनमध्ये २०६, कांगडा झोनमध्ये १७४ आणि हमीरपूर झोनमध्ये ७ रस्ते ब्लॉक करण्यात आले आहेत.

घरांची पडझड 

उत्तराखंडमध्ये शुक्रवार-शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण बेपत्ता आहेत. मुसळधार पाऊस आणि ढगफुटीच्या घटनांमुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. डेहराडून, पौडी आणि टिहरीसह तीन जिल्ह्यांमध्ये ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला असून १२ लोक बेपत्ता आहेत, तर १२ जण जखमी झाले आहेत. यातील तीन गंभीर जखमींना विमानाने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुसळधार पावसामुळे राज्यात आतापर्यंत ३४ घरांची पडझड झाली असून ७३ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.